शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरात पोलीस पाटीलपदाची मेगाभरती

By admin | Updated: August 2, 2016 03:17 IST

गावांची सुरक्षा करण्याचा प्रचंड ताण येत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी, भिवंडी यांच्या आदेशाने शहापूर तालुक्यातील रिक्त पोलीस पाटीलपदाची मेगाभरती होणार

आसनगाव : शहापूर तालुक्यातील शहापूर, किन्हवली, वासिंद, कसारा पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या तब्बल १०४ गावांना पोलीस पाटील नसल्याने पोलिसांवर गुन्ह्यांचा तपास करताना तसेच गावांची सुरक्षा करण्याचा प्रचंड ताण येत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी, भिवंडी यांच्या आदेशाने शहापूर तालुक्यातील रिक्त पोलीस पाटीलपदाची मेगाभरती होणार आहे. विशेषत: यातील ३३ टक्के पदे शासनाच्या नियमाप्रमाणे महिलांसाठी राखीव असल्याचे शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी सांगितले. शहापूर तालुक्यातील ग्रामीण भाग सध्या विकसित होत आहे. मुंबईचे बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती यांनी मोठमोठी गृहसंकुले, कारखाने तालुक्यात उभी केली आहेत. यामध्ये स्थानिक जनतेसह परप्रांतीय जनतेचादेखील भरणा अधिक असल्याने व तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कमी असल्याने कधीकधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर दुसऱ्या तालुक्यातून पोलीस बंदोबस्त मागवावा लागत असल्याने अशा परिस्थितीत गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या पोलीस पाटलांचा उपयोग होत असतो. तालुक्यातील रिक्त असलेल्या १०४ गावांसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, खुला प्रवर्गचे सोडत पद्धतीने आरक्षण नुकतेच भिवंडी येथे निश्चित करण्यात आले. (वार्ताहर)>शहापूरचे आ. पांडुरंग बरोरा यांच्या पेंढरघोळ व माजी आमदार दौलत दरोडा यांच्या कोठारे गावांनादेखील पोलीस पाटीलपद रिक्त असल्याने चर्चेचा विषय झाला आहे. या पोलीस पाटीलपदासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा व २० गुणांची तोंडी परीक्षा होणार असल्याचे तहसीलदार कोष्टी यांनी सांगितले.