शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पिकवायला सांगता; मग आयात का करता? राजू शेट्टींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण पिकवायला सांगून आयात का केली जाते? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज ह्यलोकमतह्णशी बोलताना केला. केंद्र सरकारच्या कृषी आणि आयात -निर्यात धोरणावरही त्यांनी टीका केली.खासदार शेट्टी हे उस्मानाबाद आणि सोलापूर दौऱ्यावर होते. माढा येथे सर्वाधिक ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. सायंकाळी  लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना केंद्राच्या कृषी धोरणाचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, केंद्रीय कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय एकाच इमारतीत आहेत; पण या दोन्ही मंत्रालयामध्ये समन्वय नाही. देशात डाळीचे उत्पादन वाढले असताना ५ लाख टन डाळ आयात केली आहे. खाद्य तेल, कांद्याची आयात केली जात आहे. गेल्या चार वर्षात २८ हजार कोटी रूपयांची आयात वाढून १ लाख ४० हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचली असून, केंद्राचे हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. केंद्राच्या धोरणामुळेच त्याची अस्वस्थता वाढत आहे. शेतीमाल पिकत असताना तो आयात केला जातो आणि शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत येतो. या स्थितीमुळेच शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांची नजर शिवारात, बाजारात आणि राजकारणावर असायला हवी; पण शिवारात पिकणारच नसेल तर अन्य ठिकाणी शेतकरी लक्ष तरी कसा देणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.