शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एसटीबरोबरची बैठक गुंडाळली

By admin | Updated: August 30, 2016 01:54 IST

ग्रामीण भागात एसटीमुळे होत असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीवरून बोलावलेल्या विशेष बैठकीला सदस्यच गैरहजर राहिल्याने या बैठकीत

पुणे : ग्रामीण भागात एसटीमुळे होत असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीवरून बोलावलेल्या विशेष बैठकीला सदस्यच गैरहजर राहिल्याने या बैठकीत एसटीच्या अधिकाऱ्यांनीच त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी खंत व्यक्त करीत हे सदस्यांचे बरोबर नाही, तमुच्या समस्या कशा सुटणार? असा सवाल केला.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत एसटीच्या गैरसोयीबद्दल सदस्यांनी अनेक तक्रारी केल्या. त्यामुळे याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्वासन कंद यांनी या वेळी दिले. तसेच ही बैैठक २९ आॅगस्ट रोजी होईल असेही जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी ही बैठक झाली. याला जिल्ह्यात एसटीच्या १३ डेपो मॅनेजरसह एसटी महामंडळाचे टेक्निकल हेड अरुण गोले आपल्या टीमसह उपस्थित होते. मात्र ७५पैकी चार सदस्य वगळता कोणीच उपस्थित राहिले नाहीत.जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, कुलदीप कोंडे यांच्यासह दोन महिला सदस्य उपस्थित होत्या. सुरुवातीला आशा बुचके व सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनीच बैठक सुरू केली. त्यानंतर अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे उपस्थित राहिले. कंद यांनी अधिकाऱ्यांना या वेळी विद्यार्थ्यांची गैरसोयी होऊ नये, त्यांना वेळेवर शाळेत जाता यावे व शाळेतून परत वेळेत घरी येता यावे, अशी व्यवस्था करा अशा सूचना दिल्या. त्यानंतर मग अधिकाऱ्यांनीच आपल्या समस्यांचा पाढा वाचला. आमच्याकडे सद्यस्थितीत ३८४ वाहक कमी आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांमध्ये १६७ रस्ते खराब असून, त्यांची यादीच त्यांनी तेथे दिली. तसेच एसटी मुक्कामाच्या ठिकाणी १६१ गावांमध्ये आमच्या चालक, वाहकांची शौचालयाची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. यावर अध्यक्ष कंद यांनी त्या गावांची यादी द्या, मी ग्रामपंचायतींना सूचना करून त्यांची व्यवस्था कशी होईल हे पाहतो. तसेच जेथे काहीच व्यवस्था नाही तेथे काय करता येईल हे आपण पाहू असे आश्वासन दिले. आशा बुचके यांनी अधिकाऱ्यांना तालुक्यातील एसटी महामंडळाच्या जागा शोधून त्या नावावर करून घ्या असे आवाहन केले. तसेच जुन्नर तालुक्यातील गैरसोयी मांडल्या. कुलदीप कोंडे यांनी वेल्हेत एसटी डोपाची मागणी केली. (प्रतिनिधी)