नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला असल्याने त्यांची तत्काळ बदलीची मागणी केली जाणार आहे.आयुक्त तुकाराम मुंढे विरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या घरावरील कारवाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अशा स्थितीत ऐरोलीत कारवाई करून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणली. याचे पडसाद मंगळवारी महासभेत उमटले. संतापलेल्या नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. बुधवारी सभेमध्ये आयुक्तांचा निषेध करून सर्वच नगरसेवक थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)
सर्वपक्षीय नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
By admin | Updated: March 22, 2017 02:28 IST