शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:54 IST

शेतकऱ्यांच्या तणावमुक्तीसाठी बीड, उस्मानाबादेत प्रशासनाचे पाऊल

गजानन दिवाण ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दुष्काळाच्या संकटात अन्नदात्याचा आत्मविश्वास कमी होऊ नये, त्याच्यात अपराधाची भावना निर्माण होऊ नये. तो तणावमुक्त राहावा यासाठी प्रशासनाने चारा छावण्यांमधील वातावरण हसते-खेळते ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉलपासून क्रिकेटपर्यंत आणि आरोग्यापासून ध्यानधारणेपर्यंतचे विविध उपक्रम बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील चारा छावण्यांमध्ये राबविले जात आहेत.

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत सद्य:स्थितीत ७१९ चारा छावण्या सुरू आहेत. यातून चार लाख ८५ हजार ८७० जनावरांच्या चारा-पाण्याचाप्रश्न मिटला आहे. छावण्यांमध्ये पशुधनांसोबत एक माणूस राहणे आवश्यक आहे. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी छावणीत दिवसभर काय करायचे? अशावेळी दुष्काळी परिस्थितीच्या विचारातून तो खचून जाऊ नये, छावणीवरच त्याचे मन रमावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील अधिकाºयांची बैठक घेऊन आढावा घेतला. अशा उपक्रमांतून शेतकºयांचा आत्मविश्वास वाढवायला हवा, अशा सूचना त्यांनी केल्या.

फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट आदी खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. जगभरातील घडामोडी कळाव्यात म्हणून छावण्यांवर डीटीएचसह टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकºयांचे आरोग्य तपासणी शिबीर, वेगवेगळ्या पिकांसंदर्भात प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जात आहेत. अनेक ठिकाणी लेझीम खेळले जाते. काही ठिकाणी भजन, प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत. छावण्यांवर पथनाट्याच्या माध्यमातून शेतकºयांमध्ये जागृती केली जात आहे. वातावरण प्रफुल्लित ठेवण्यासाठी अनेक छावण्यांवर फुगे लावण्यात आले आहेत. घराचा कर्ता माणूस जनावरांसोबत छावण्यांवर गेल्याने गावात स्वस्त धान्य दुकानातील साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे.छावण्यांवर ग्रामगीताचारा छावण्यांवर भजन, कीर्तनासह आता ग्रामगीतेच्या माध्यमातून शेतकºयांचे प्रबोधन केले जाणार आहे. विविध कार्यक्रम आणि प्रशिक्षणातून शेतकºयांना मानसिक बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.- आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी, बीडध्यानधारणा आणि प्रशिक्षणशेतकºयांच्या मानसिक आरोग्यासाठी छावण्यांवर ध्यानधारणा शिबीर घेतले जात आहे. शिवाय परंडा परिसरात तुलनेने पाणी जास्त असल्याने उसाचे क्षेत्र अधिक आहे. उसाऐवजी कमी पाण्याचे पीक म्हणून शेतकºयांनी हळद-आले पिकाकडे वळावे यासाठी छावण्यांवरच प्रशिक्षण दिले जात आहे.- दीपा मुधोळ-मुंडे,जिल्हाधिकारी, उस्मानाबाद