शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

एफडीए पाठवणार नेपाळला औषधे

By admin | Updated: May 2, 2015 01:47 IST

नेपाळमधील भूकंपामध्ये जखमी झालेल्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांची गरज आहे.

मुंबई : नेपाळमधील भूकंपामध्ये जखमी झालेल्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील ३० औषध कंपन्यांकडून आतापर्यंत विविध आवश्यक औषधांनी भरलेली १,३०९ खोकी एफडीएने गोळा केली आहेत. नेपाळ येथे झालेल्या भूकंपामुळे १५ हजारांहून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तिथल्या पायाभूत सुविधाही जमीनदोस्त झाल्याने औषधांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एफडीएने औषध कंपन्यांना औषधे देण्याचे आवाहन केले होते. राज्यातील ३० औषध कंपन्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. बॅण्डेज, सर्जिकल हॅण्डग्लोव्ह्ज, वेदनाशामक औषधे, प्रतिजैविके, अ‍ॅण्टीडायरियाची औषधे, टिटॅनस टाक्साइडची इंजेक्शन्स, निर्जंतुकीकरणाची औषधे, इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी औषधे मागवण्यात आलेली आहेत. पण अजूनही ही औषधे पाठवण्यात आलेली नाहीत. कारण तिथे मोठ्या प्रमाणात मदत पोहोचली तरी तिथे सध्या साठा करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. औषधे पाठविण्यास काठमांडू येथून संमती मिळाल्यावर ही औषधे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.