शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

वैद्यकीय ज्ञानदानाचा हीरकमहोत्सवी यज्ञ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 06:00 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी खासगी कोचिंगवाले लाखोंच्या घरात शुल्क आकारत असताना मुंबईतील ज्येष्ठ शल्य विशारद डॉ. ओम प्रकाश तथा ओ.पी. कपूर हे या क्षेत्रातील विद्यार्थी, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना मुक्त हस्ताने डॉक्टरकीचे ज्ञान देत आहेत.

- जमीर काझीवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी खासगी कोचिंगवाले लाखोंच्या घरात शुल्क आकारत असताना मुंबईतील ज्येष्ठ शल्य विशारद डॉ. ओम प्रकाश तथा ओ.पी. कपूर हे या क्षेत्रातील विद्यार्थी, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना मुक्त हस्ताने डॉक्टरकीचे ज्ञान देत आहेत. वयाची ८६ वर्षे पार करीत असलेल्या धन्वंतरीच्या विनामूल्य ज्ञानदानाचा हा यज्ञ एक, दोन नव्हेतर, आता सहा दशकांचा कालावधी पूर्ण करीत आहे. त्याबद्दल डॉक्टरांचे डॉक्टर असलेल्या या अवलियाच्या कार्याचा घेतलेला आढावा.फाळणीच्या वेळी लाहोरमधून थेट मुंबईत आलेल्या ओ.पी. कपूर यांनी अन्य पंजाबी तरुणांप्रमाणे हॉटेल व्यवसाय किंवा चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करण्याऐवजी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. प्रतिकूल परिस्थितीत गुणवत्तेच्या जोरावर ग्रांट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविला. एमबीबीएसनंतर पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी एकदा जेजेतील मोतलीबाई थिएटरमध्ये पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रात्री मोफत लेक्चर घेतले. त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे तेव्हापासून दर शुक्रवारी रात्रभर लेक्चर सुरू झाले. पहाटेपर्यंत चालणाºया या वर्गातून एकही विद्यार्थी बाहेर पडत नसे.वैद्यकीय परिभाषा, त्याचे किचकट शब्द आणि तंत्राचे ओ.पी. इतक्या सोप्या पद्धतीने सादरीकरण करीत असल्याने तरुणांच्या ते कायम स्मरणात राहत असे. त्यामुळे त्यांचे नाव अल्पकाळात महानगरात प्रसिद्ध झाले. निखळ ज्ञानाचा हा धबधबा ते जे.जे.तून निवृत्त होईपर्यंत म्हणजे तब्बल २८ वर्षे अखंडपणे चालू होता. त्यामध्ये ४० हजारांवर डॉक्टरांनी त्याचा फायदा करून घेत करिअरची गाडी रुळावर आणली. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णाच्या निदानासाठी असाधारण, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र ४०-४५ वर्षांपूर्वी डॉ. कपूर यांनी दुर्धर आजार असलेले अनेक पेशंट बरे केले होते. त्यांची निदानाची शैली आजच्या पिढीसाठी संशोधनाचा विषय बनू शकतो. त्यांचे व्याख्यान, निदान शैलीची माहिती भारतातील वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या एका ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या संपादकाला समजली. एकाचवेळी हजारावर विद्यार्थी रात्रभर जागून त्यांचे लेक्चर ऐकतात, यावर सुरुवातीला विश्वास न बसल्याने पहिल्यांदा त्यांनी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जाऊन खातरजमा करून घेतली. त्यानंतर तिने त्यांच्या कार्याची माहिती ब्रिटिश जर्नलमध्ये दिली. ओ.पी. जेजेतून निवृत्त झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शीव, केईएम, नायर आणि जे.जे.तील डीग्री व पोस्ट गॅ्रज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन तास सुरू ठेवण्यासाठी विनंती केली. डॉक्टरांना त्यांचा आग्रह मोडता आला नाही, त्यांनी ३ महिने आठवड्यातून एकदा व्याख्यान देण्याचे कबूल केले. परंतु चारही कॉलेजच्या जवळपास १२०० मुलांना एकत्र बसण्याइतका मोठा हॉल लागणार होता. बॉम्बे हॉस्पिटलचे विश्वस्त एस.के. जैन यांनी बिर्ला मातोश्री सभागृह मोफत देण्याची तयारी दर्शविल्याने हा प्रश्न मिटला. फक्त रात्री वेळ बदलून दर रविवारी सकाळी साडेसात ते दुपारी अडीचपर्यंत व्याख्यान होत राहिले. केवळ ३ महिन्यांसाठी ठरविलेल्या या व्याख्यानमालेला आता ३८ वर्षांचा अवधी पूर्ण होत आहे. या कालावधीत ओ.पीं.नी ३७५ वर अमृतबोलाची पुष्पे गुंफली असून जवळपास ७५ हजारांवर डॉक्टरांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्याशिवाय देशभरात विविध १६० शहरांमध्ये ‘ विकेण्ड रिफ्रेशर’ कोर्स घेतले आहेत. वैद्यकीय क्षेत्रामधील नवनवीन संशोधनाबाबत अवगत राहत त्यांनी १२ पुस्तके विविध भाषेमध्ये लिहिली आहेत. ‘बॉम्बे हॉस्पिटल जर्नल’चे संपादक म्हणून अनेक वर्षांपासून विनामूल्य जबाबदारी ते सांभाळत आहेत.मोफत ज्ञानदान व संपादनाचे काम करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असल्याचे ते सांगतात. शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदान करण्याचा त्यांचा ध्यास आजच्या जमान्यातील ‘कट प्रॅक्टिस’ करणाºया डॉक्टरांना सणसणीत चपराक आहे.बाथरूम सिंगरअसोसिएशनचे संस्थापकओ.पी. कपूर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये झोकून दिले असले तरी स्वत:च्या आवडीनिवडी, छंद, कला याबद्दलची आपुलकीही कायम ठेवली आहे. त्यातून त्यांनी बाथरूम सिंगर्स असोसिएशनची स्थापना केली. तबला, पियानो, पेटी ही वाद्ये वाजविणाºया रुग्णमित्रांना त्यामध्ये सभासद करून घेतले. स्वत:च्या आवाजामध्ये जुन्या हिंदी गाण्यांचे रेकॉर्डिंग केले आहे. सुमारे २५ तासांचा ध्वनिमुद्रित गाण्यांचा संच जमविला आहे.ओ.पी. यांच्या असामान्य ज्ञानाचा अनुभव डॉक्टरांबरोबरच समाजातील विविध क्षेत्रांतील मंडळींनी घेतला आहे. अगदी पृथ्वीराज कपूर, राज कपूर, मुकेशपासून सलमान खान, काजोल व रणबीर कपूरपर्यंतची बॉलीवूडमधील पिढी त्यांचे पेशंटच नव्हे, तर परमभक्त बनली आहेत. त्यांच्या या ज्ञानकुंडाची दखल घेत वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे बी.सी. रॉय, बेस्ट टिचर आॅफ मिलिनियम, धन्वंतरी असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीय