शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय आस्थापना कायदा लवकरच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्यात येत्या तीन महिन्यांत डॉक्टरांशी चर्चा करूनच सर्वसमावेशक वैद्यकीय आस्थापना कायदा लागू करण्यात येईल. ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात येत्या तीन महिन्यांत डॉक्टरांशी चर्चा करूनच सर्वसमावेशक वैद्यकीय आस्थापना कायदा लागू करण्यात येईल. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याने हा कायदा अमलात आणावा, यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियादेखील आग्रही आहेत. त्यामुळे लवकरच तज्ज्ञ समितीचा अहवाल घेऊन त्यानुसार या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत वेलनेस मेन्टाॅर पुरस्कार सोहळ्या’त गुरुवारी दिली. 

टोपे म्हणाले, वैद्यकीय आस्थापना कायद्याविषयी अजूनही वैद्यकीय वर्तुळात मतमतांतरे आहेत. त्यामुळे हा कायदा आणताना यात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांची मते आणि विचार जाणून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपचार शुल्क, रुग्णालयाची जागा, तेथील मनुष्यबळ, चाचण्यांच्या सेवा, औषधांचे प्रिस्क्रिप्शन कायद्याच्या चौकटीत येणार आहे. परिणामी, कोणत्याही वैद्यकीय शाखा किंवा घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 

खासगी क्षेत्राच्या अडचणी जाणून घेणार कोरोना काळात ज्याप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी वैद्यकीय सेवा क्षेत्रांनी मिळून योगदान दिले. त्याप्रमाणे, येत्या काळात खासगी वैद्यकीय सेवा क्षेत्राकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याही अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

जन आरोग्य योजनेचे बळकटीकरणमहात्मा फुले जन आरोग्य योजनेची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात येणार आहे. या योजनेचे विमा कवच दीड लाखाहून अधिक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे टोपे यांनी अधोरेखित केले, तसेच धर्मादाय रुग्णालयांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक बदल करून या योजनेसाठी किमान तीस टक्के खाटा उपलब्ध करून देण्यात येतील. योजनेत आणखी काही आजारांचा समावेश करण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.    

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपे