शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत, नाशिक १३.८ अंशांसह सर्वांत थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 05:51 IST

वाढत्या उन्हाच्या चटक्यांनी ‘आॅक्टोबर हीट’ने मुंबईकरांचा घाम निघत असून राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. तर सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे.

मुंबई : वाढत्या उन्हाच्या चटक्यांनी ‘आॅक्टोबर हीट’ने मुंबईकरांचा घाम निघत असून राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. तर सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील नोंदीनुसार, सांताक्रुझ वेधशाळेत ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याच वेळी नाशिकमध्ये मात्र थंडीची लाट दिसून आली असून, तेथे किमान तापमान सर्वांत कमी १३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट नोंदवण्यात आली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. २ नोव्हेंबरपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सून परतण्यापूर्वीच ‘आॅक्टोबर हीट’ने मुंबईकरांना घाम फोडला होता. कमाल तापमानातील वाढ, आर्द्रतेमधील वाढ आणि कडक उन्हामुळे मुंबईकर होरपळून निघाले होते. मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातून हद्दपार झाल्यानंतर यात आणखी वाढ झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान थेट ३६ अंशावर पोहोचले आहे. परिणामी, कमाल तापमानाच्या वाढत्या आलेखाने मुंबईकर हैराण झाले आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्य