ठाणे : एका रुग्णवाहिकेला वाहतुक नियमानाबाबत सांगणाऱ्या महिला पोलीसाचा त्याच रुग्णवाहिकेमधील एकाने विनयभंग करुन त्यांना जबरदस्तीने थेट रुग्णालयापर्यन्त नेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वेगवेगळया कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले.कॅडबरी जंक्शन येथे ही पोलीस महिला शनिवारी सायंकाळी ६.४५च्या सुमारास वाहतुकीचे नियमन करीत असतांना कापूरबावडीकडून मुंबईच्या दिशेने ही रुग्णवाहिका आली. विवियाना मॉलच्या दिशेने जाऊन पुन्हा या रुग्णवाहिकेने वळण घेतले. तेंव्हा सिग्नल बंद असल्याने यू टर्न घेऊन पुढे लवकर जाता आले नाही. तेंव्हा रुग्ण महिलेजवळ बसलेल्या एका अनोळखीने या पोलीस महिलेला बोलविले. त्यांच्या युनिफॉर्मला पकडून धक्काबुक्की केली. माझ्या पत्नीला स्वाईन फ्लू झाला आहे, तुला समजत नाही का, तुझी नोकरी घालवीन, असे म्हणून त्यांना अरेरावी केली. त्यांचा जबरदस्तीने ज्युपिटर रुग्णालयात नेऊन त्यांना दमदाटी करुन शिवीगाळही केली. त्यांचे मगळसूत्रही तोडले. (प्रतिनिधी)
वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाचा विनयभंग
By admin | Updated: September 7, 2015 00:59 IST