शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
2
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
7
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
8
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
9
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
10
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
11
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
13
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
14
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
15
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
16
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
17
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
18
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘इंदू मिल’वरून मातंग समाज आक्रमक

By admin | Updated: May 5, 2015 01:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी प्रत्यक्ष कामाची सुरुवात १८ मेपर्यंत करा, नाहीतर बेमुदत उपोषण सुरू करू,

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी प्रत्यक्ष कामाची सुरुवात १८ मेपर्यंत करा, नाहीतर बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा अखिल भारतीय मातंग संघाने दिला आहे. शिवाय मातंग समाजाला अनुसूचित जातीत स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले म्हणाले, की गेल्या काही महिन्यांपासून युती सरकारकडून वारंवार बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन लवकरच करण्याची घोषणा करण्यात येत आहे. मात्र नेमके भूमिपूजन कधी होणार आणि इंदू मिलच्या जागेवर प्रत्यक्ष बांधकामास कधी सुरुवात होणार, याबाबत कोणताही खुलासा सरकारने केलेला नाही. त्यामुळे १७ मेपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात केली नाही तर १८ मेपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा गोपले यांनी दिला आहे. गोपले गेल्या १ हजार ४६० दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे. दरम्यान, सत्तेत येण्याआधी भाजपा नेते विनोद तावडे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा गोपले यांनी केला आहे. त्याप्रमाणे सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनाची पूर्तता करण्याचे आवाहन गोपले यांनी केले. मातंग आरक्षण समितीची स्थापना करण्याची मागणी गोपले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)