शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मॅटचा निर्णय सरकारच्या विरोधात जाण्यासाठी अधिका-यांचा कट

By अतुल कुलकर्णी | Updated: December 9, 2017 05:43 IST

अन्न व औषधी विभागातल्या बदली झालेल्या १२ अधिका-यांनी मंत्रालयातील अधिका-यांना हाताशी धरून सरकारने अन्याय केल्याचे भासवत खरी माहिती दडवून ठेवली

मुंबई : अन्न व औषधी विभागातल्या बदली झालेल्या १२ अधिका-यांनी मंत्रालयातील अधिका-यांना हाताशी धरून सरकारने अन्याय केल्याचे भासवत खरी माहिती दडवून ठेवली. शिवाय, मॅटचा निर्णय सरकारच्या विरोधात जावा यासाठी जाणीवपूर्वक कट रचला, असा गंभीर आक्षेप मॅटचे चेअरमन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी नोंदवला आहे.एवढेच नाही तर, आम्ही नोंदविलेले आक्षेप संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना निदर्शनास आणून देण्यासाठी थेट अ‍ॅडव्होकेट जनरला नोटीस द्यावी का? अशी विचारणाही मॅटने केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारी वकिलांनी तात्काळ मंत्र्यांचे दालन गाठले. आता या प्रकरणी पापक्षालन करण्याची याचना करणारे शपथपत्र खात्याच्या सचिवांनी मॅटला सादर केले आहे.अन्न व औषधी विभागात मुंबई, ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाºयांच्या बदल्या झाल्या पाहिजेत, अशी शिफारस लोकमत वृत्तमालिकेनंतर नेमण्यात आलेल्या महेश झगडे, अ‍ॅड. उदय बोपशेट्टी यांच्या समितीने केली होती. त्यानुसार मंत्री गिरीश बापट यांनी अशा १२ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. त्या बदल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली. मात्र अर्धवट माहिती देत त्या १२ अधिकाºयांनी या आदेशाला मॅटमधून स्थगिती मिळवली. त्यामुळे मंत्री बापट यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी मॅटने तीन महिन्यात तातडीने निर्णय घ्यावा आणि तोपर्यंत मॅटच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर तो ‘कंटेम्प्ट’ होणार नाही असे आदेश दिले. या निर्णयानंतर मॅटचे चेअरमन जोशी यांनी स्वत: हे प्रकरण सुनावणीस घेतले.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय