शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

नाराजांची समजूत ‘मातोश्री’वर !

By admin | Updated: September 29, 2016 06:43 IST

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मराठा मोर्चाबाबत प्रकाशित व्यंगचित्राच्या निषेधार्थ राजीनामे देणारे बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर

मुंबई/बुलडाणा : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मराठा मोर्चाबाबत प्रकाशित व्यंगचित्राच्या निषेधार्थ राजीनामे देणारे बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि सिंदखेडराजाचे आमदार शशिकांत खेडेकर यांची समजूत काढण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आल्यानंतर या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. या राजीनाम्यामुळे शिवसेनेतील वादंग तूर्त मिटला असला तरी मराठा प्रश्नाबाबत यापुढे अतिशय सावध भूमिका घेण्याचे आणि या समाजाला अजिबात न दुखावण्याचे धोरण शिवसेना नेत्यांनी घेण्याचे ठरविले आहे. त्याचाच भाग म्हणून सामना दैनिकातील बातम्या या समाजाच्या विरोधात अजिबात असू नयेत आणि शक्य तितक्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे नेत्यांनी ठरविल्याचे सांगण्यात आले.खा. जाधव आणि इतर दोन आमदारांना ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले. त्या वेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, पक्षाचे काही मंत्री उपस्थित होते. व्यंगचित्रकाराने आजच्या सामनामध्ये माफी मागितलेली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता, तुम्ही माझ्याकडे राजीनामे दिलेले असले तरी ते मी स्वीकारणार नाही. शिवाय, ते व्यंगचित्र ही शिवसेनेची स्वप्नातदेखील भूमिका असू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी तिघांनाही सांगितले. दरम्यान, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी गुरुवारच्या अंकात माफीनामा द्यावा, अशी मागणी खा. जाधव आणि इतर दोन आमदारांनी या वेळी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या माफीनाम्याबाबत पक्षाच्या इतर नेत्यांकडूनही दबाव असल्याचे समजते. दरम्यान, व्यंगचित्रकाराने माफी मागितलेली असताना खरे तर या वादावर आता पडदा पडला आहे. पण जे आमच्यावर जळतात आणि ज्यांना महाराष्ट्रात शांतता नको आहे, ते लोक विरोधात बोलत आहेत, असे खा. राऊत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)ठिकठिकाणी गुन्हे दाखलसामनातील व्यंगचित्रावर संबंधित व्यंगचित्रकाराने माफीनामा सादर करूनही हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.औरंगाबाद येथील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात शिवक्रांती सेनेचे रवींद्र काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. तर परभणी येथे अ‍ॅड. विष्णू नवले यांच्या तक्र ारीनंतर नानल पेठ पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोलीत मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे, तर वसमत येथे शंकर दगडू कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. शिवसेनेची स्थापनाच व्यंगचित्रामुळे, पण...शिवसेनेची स्थापनाच मुळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या जोरावर केली होती. त्यांची व्यंगचित्रे पाहूनच तेव्हाचा मराठी माणूस पेटून उठत असे. त्यातूनच शिवसेनेची स्थापना झाली होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची अनेक व्यंगचित्रे केवळ बोचरीच नव्हे, तर काही वेळा अनेकांना विखारीही वाटत असत. त्यांनी व्यंगचित्रांसाठी वापरलेल्या कुंचल्यातून तेव्हाचा एकही नेता सुटला नव्हता आणि जवळपास चळवळीवर त्यांनी व्यंगचित्रांद्वारे भाष्य केले होते. मात्र त्याच शिवसेनेला एका व्यंगचित्रामुळे आता अतिशय अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. एवढेच नव्हे, तर कोणत्याही प्रकरणात दिलगिरी व्यक्त न करणाऱ्या दैनिक सामनाला या वेळी अप्रत्यक्ष का होईना, मराठा समाजाची माफी मागावी लागली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी संबंधित व्यंगचित्राबद्दल माफी मागितली असली, तरी त्यामुळे अनेक व्यंगचित्रकार नाराज झाले आहेत. शिवसेनेने असे करायला नको होते, असे काहींनी बोलून दाखवले.डिक्शनरीमध्ये दिलगिरी हा शब्द नव्हता आतापर्यंत शिवसेनेच्या धमक्या व इशाऱ्यांमुळे इतरांना दिलगिरी व्यक्त करावी लागत असे. पण ही वेळ आता शिवसेनेवरच आली, हे काही जुन्या शिवसैनिकांनाच खटकले आहे. स्व. बाळासाहेबांच्या डिक्शनरीमध्ये दिलगिरी हा शब्द नव्हता आणि ते कधी शब्द मागे घेत नसत. शिवाय जातीच्या आधारावर आरक्षणाला त्यांचा कायम विरोध होता. तो त्यांनी कधी लपवून ठेवला नव्हता. असंख्य शिवसैनिक मराठे आहेत, हे लक्षात घेत, मुळात आंदोलनाची अशी टिंगलटवाळी करणे योग्यच नव्हते. पण आधी नको ते केले आणि आता त्याचे परिणाम बराच काळ सहन करावे लागतील, असे काही शिवसैनिकांनी बोलून दाखवले.खा. प्रतापराव जाधव व आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासोबत मी आज मातोश्रीवर गेलो होतो. तेथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. व्यंगचित्रकाराने माफी मागितलेली असल्याने आम्ही राजीनामे मागे घेतले आहेत.- आ. संजय रायमूलकर, मेहकर