शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मातोश्रीवर भेटीचे ‘राज’

By admin | Updated: July 30, 2016 05:53 IST

ठाकरे बंधूंमधील ‘राज’कारणाने आज दादरच्या कृष्णकुंजहून वांद्रा येथील मातोश्रीकडे अचानक वळण घेतले. अनेक दिवसांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडत

मुंबई : ठाकरे बंधूंमधील ‘राज’कारणाने आज दादरच्या कृष्णकुंजहून वांद्रा येथील मातोश्रीकडे अचानक वळण घेतले. अनेक दिवसांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एक तास बंदद्वार चर्चा केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले. ठाकरे बंधूंमध्ये कौटुंबिक वास्तपुस्त होऊन राजकीय दुरावा कमी करण्यावरही एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. साडेतीन वर्षांनी राज शुक्रवारी पुन्हा मातोश्रीवर गेले. उद्धव यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, स्नेहभोजनही घेतले. राज यांच्या ‘मातोश्री’भेटीची वार्ता कानोकानी होताच तर्कवितर्कांना एकच उधाण आले. मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षारंभी होणार आहेत. त्यादृष्टिने या भेटीकडे पाहिले जात आहे. तसेच उद्धव आणि जयदेव यांच्यात सुरू असलेल्या वादाने वेगळे वळण घेतले असल्याने राज यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. या भेटीबाबत उद्धव वा राज यांनी अधिकृतपणे कोणताही खुलासा केला नसला तरी, सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार उभयतांमध्ये एकत्र येण्यावरही चर्चा झाल्याचे समजते. देशभर भाजपाचे वारू चौखुर उधळत असून प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे धोरण अमित शहा आणि प्रभुती राबवत आहेत. हा धोका शिवसेना ओळखून आहे. अशा परिस्थितीत राज यांची साथ कामी येऊ शकते, असा तर्क शिवसेनेत लढविला जात आहे. राज यांचे सहकार्य लाभले तर मुंबईत निर्विवाद सत्ता मिळू शकते. उभयतांच्या भेटीमागे हे राजकारण असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)...अन् गाडी मातोश्रीत राज यांच्या मातोश्री भेटीत नेमके काय घडले, ही ‘आतली’ बातमी गुलदस्त्यात ठेवत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेले कथन असे- मला राजसाहेबांनी काल सायंकाळी कृष्णकुंजवर बोलावले होते. पण नंतर शुक्रवारी सकाळी ये असा निरोप आला. त्यानुसार मी सकाळी कृष्णकुंजवर गेलो. चहा घेतला. ते तयार होऊन आले आणि मला ‘चल बाहेर जायचे आहे,’ असे सांगितले. त्यावर शर्मिला वहिनींनी कोठे जाताय, असे विचारले. पण काहीही न बोलता आम्ही खाली आलो. नंतर गाडीत बसलो आणि गाडी थेट मातोश्रीच्या दिशेने निघाली. मी आश्चर्यचकित झालो होतो. आम्ही गेलो. बाळासाहेबांच्या फोटोला त्यांनी नमस्कार केला. त्यानंतर ते आणि उद्धवजी दोघेही वरच्या माळ्यावर गेले. तासाभराने दोघे खाली आले. मी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते दारापर्यंत सोडायला आले. आमची गाडी मातोश्रीच्या बाहेर जाईपर्यंत ते दाराबाहेरच उभे होते. पण गाडीत बसल्यावर राज यांनी दुसऱ्याच विषयावर गप्पा सुरू केल्या..!