शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सेना प्रवेशासाठी मातोश्रीवर गर्दी

By admin | Updated: January 28, 2017 04:10 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी सर्वपक्षीय इच्छुकांनी मातोश्रीवर गर्दी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी सर्वपक्षीय इच्छुकांनी मातोश्रीवर गर्दी केली. शिवसेना मुंबईतील सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुंपणावरील अन्य पक्षीय नेते व इच्छुकांनी शिवसेनेचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली आहे. मराठी अस्मितेची धरलेली कास आणि युतीच्या राजकारणात भाजपासाठी शिवसेनेने मुंबईतील अन्य भाषिक मतदारसंघांकडे दुर्लक्ष केले होते.यंदा मात्र अशा ठिकाणीही शिवसेना उमेदवारी देणार असल्याचे निश्चित झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपल्या पक्षाच्या कामगिरीवर साशंक असणाऱ्या नेते युतीतील शिवसेना आणि भाजपाकडे वळण्याची शक्यता खरी ठरत असून शक्रवारी काँग्रेस आणि सपाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे कट्टर समर्थक असलेले मालाड पश्चिमेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक बलदेवसिंग मानको उर्फ बिल्लाजी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बिल्लाजी यांची कन्या प्रबलीन कौर मानको यांनीही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. तर समाजवादी पक्षाच्या मुंबई युवा विंगच्या अध्यक्षा आणि अबू आझमी यांची निकटवर्तीय नेहा खान यांनी आपल्या मुस्लीम कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश झाला. शिवसेना, भाजपाच्या या कलगीतुऱ्याचा थेट फटका काँग्रस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अन्य पक्षांतून शिवसेना आणि भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)