शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानचे इंजिन दार्जिलिंगमध्येही घसरले

By admin | Updated: January 12, 2017 04:36 IST

माथेरानची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनचे डबे घसरल्याच्या घटना नेरळ ते माथेरानमध्ये घडल्यानंतर

मुंबई : माथेरानची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनचे डबे घसरल्याच्या घटना नेरळ ते माथेरानमध्ये घडल्यानंतर, या ट्रेनचे इंजिन दार्जिलिंगमध्ये पाठवण्यात आले. मात्र, दार्जिलिंगमध्ये छोट्या ट्रेनच्या सेवेत गेलेले हे इंजिन आणि दोन डबे घसरल्याची घटना मंगळवारी घडली. त्यामुळे या तांत्रिक बाबीचा शोध मध्य रेल्वेकडून घेतला जात आहे.२0१६ मधील मे महिन्यात माथेरान ट्रेनचे इंजिन व डबे घसरण्याच्या दोन घटना घडल्या. या घटनेनंतर सुरक्षेचे उपाय योजल्याशिवाय मिनी ट्रेन सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ट्रेनच्या इंजिनाला एअर ब्रेक प्रणाली, माथेरानच्या घाट परिसरात संरक्षक भिंत इत्यादी उपाययोजना करण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी केल्या. त्यानुसार, त्याचा आढावा घेतल्यानंतर, रेल्वेमंत्रालयाने सुरक्षेसाठी ६ कोटींपेक्षा जास्त निधीही मंजूर केला. त्यामुळे ही ट्रेन सुरू होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. तत्पूर्वी मिनी ट्रेनच्या इंजिनाला एअर ब्रेक नसल्याने, ती माथेरानमध्ये चालविणे धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे एअर ब्रेक बसवण्यासाठी इंजिन दार्जिलिंगमध्ये पाठवण्यात आले. मात्र, हेच इंजिन जोडून दार्जिलिंगमध्ये दोन डब्यांची ट्रेन चालवण्यात आली असता ट्रेन घसरली. या घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात असला, तरी त्याची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कानपूर प्रकरणात रेल्वे अधिकाऱ्याची बदलीकानपूर येथे एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची घटना नुकतीच घडली होती आणि यात शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. या ट्रेनच्या डब्यांची देखभाल-दुरुस्ती ही लोअर परेल येथील कारखान्यात झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार, सखोल चौकशीही केली जात होती. या प्रकरणात कारखान्याच्या व्यवस्थापकाची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले.