शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये शिक्षणाचा बोजवारा

By admin | Updated: June 13, 2016 03:20 IST

शाळा सुरू होण्यास काही दिवसच उरलेले असताना विद्यार्थ्यांना नक्की कुठल्या शाळेत प्रवेश द्यावा याबाबतीत पालकवर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली

माथेरान : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात देखील राजकीय वादळ घोंगावताना दिसत असून शाळा सुरू होण्यास काही दिवसच उरलेले असताना विद्यार्थ्यांना नक्की कुठल्या शाळेत प्रवेश द्यावा याबाबतीत पालकवर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षणाचा पुरता बोजवारा उडण्याची चिन्हे निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक जीवनशैली धोक्यात आली आहे.येथे १९६८ मध्ये शिक्षणमहर्षी शांताराम यशवंत गव्हाणकर यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते. तत्पूर्वी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत सर्वच विद्यार्थी नगरपरिषदेच्या शाळेतच शिक्षण घेत होते. परंतु मागील तीन वर्षांपासून गव्हाणकर शाळेने दरवर्षी एक एक वर्ग बंद करून ही शाळा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मार्गावर असल्याने उशिरा का होईना राजकीय मंडळींना निवडणुका जवळ आल्यावर जाग आली आहे. पालक व स्थानिकांच्या बैठका बोलावून राजकीय मंडळी आश्वासन देत आहेत. या शाळेबाबत अधिकारी, अंतर्गत राजकारण करीत असून याचा नाहक त्रास विद्यार्थी, पालकांना होत आहे. माथेरानसारख्या दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणून गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शांताराम गव्हाणकर यांनी शाळा सुरू केली होती. मात्र आता ही शाळा बंद पडण्याच्या स्थितीत असून यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त के ली जात आहे. सध्या येथे सातवीपर्यंतचे वर्ग सुरू असतात. गव्हाणकर शाळा बंद होणार आहे हे वर्षापूर्वी जवळपास निश्चित झाले होते, परंतु यंदा विद्यार्थ्यांना वेठीस धरूनच आगामी निवडणुकीचे यानिमित्ताने राजकारण शिजले जात असल्याचे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. १० मे रोजीच्या अवकाळी वादळी पावसात शाळेची वरील भागांची नासाडी झाली. या महत्त्वपूर्ण कामास लोकप्रतिनिधींनी गती द्यायला हवी होती, कामाची ती गती नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त के ली आहे. (वार्ताहर)