शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 19:13 IST

नाशिक : प्रॉपर्टीच्या वादातून सासूवर हात उगारलेल्या जावयाच्या डोक्यात संतप्त शालकाने फावड्याच्या दांडका मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २४) दुपारच्या सुमारास पाथर्डी परिसरात घडली़

ठळक मुद्देपाथर्डी फाट्यावरील घटना: दांडक्याने मारहाणइंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : प्रॉपर्टीच्या वादातून सासूवर हात उगारलेल्या जावयाच्या डोक्यात संतप्त शालकाने फावड्याच्या दांडका मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २४) दुपारच्या सुमारास पाथर्डी परिसरात घडली़ शशिकांत बाळू खुर्दळ (रा. खतवड, ता़ दिंडोरी) असे मृत्यू झालेल्या जावयाचे नाव आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सासू व मारहाण करणाºया शालकास ताब्यात घेतले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाट्यावरील विक्रीकर भवनजवळ असलेल्या तुळशीराम रो-हाउसमध्ये सुनंदा आनंदा मगर ही मुलगा सुनीलसोबत राहते़ शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुनंदाबाईच्या मुलीचा नवरा अर्थात जावई शशिकांत बाळू खुर्दळ हा सासुरवाडीला आला होता़ घरामध्ये आल्यानंतर काही वेळातच सासू सुनंदा व जावई शशिकांत यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या विषयावरून वाद सुरू झाला़ सुमारे दोन सुरू असलेला हा वाद इतका टोकाला गेला की जावई शशिकांत याने सासू सुनंदा हिच्यावर हात उचलला़ या ठिकाणी उपस्थित असलेला सुनंदा यांचा मुलगा व मयत खुर्दळ यांचा शालक सुनील याचा राग अनावर झाला व त्याने घरातील फावड्याचा दांडा उलचून दाजी शशिकांतच्या डोक्यात मारला़सुनीलने डोक्यात मारलेला दांडक्याचा आघात इतका जबर होता की, मेव्हणा शशिकांतचा जागीच मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ या ठिकाणी पडलेल्या शशिकांत यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाल हलविण्यात आला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सासू सुनंदा मगर व शालक सुनील मगर या दोघांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़