शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘मास्टर ब्लास्टर’च्या कन्येला लग्नासाठी फोनवरून वारंवार धमकी, परप्रांतीय तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:37 IST

‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या परप्रांतीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली.

मुंबई : ‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. देवकुमार मेट्टी (३२) असे त्याचे नाव असून, रविवारी त्याला वांद्रेतून मुंबईत आणण्यात आले. महिन्याभरापासून तब्बल २२ वेळा तेंडुलकरच्या घरी फोन करून तो त्रास देत होता. साराला एकदा टीव्हीवर पाहिल्यानंतर तिच्या प्रेमात पडल्याची कबुली देवकुमार मेट्टी याने दिली आहे, तर त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे त्याचे शेजारी व नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  प. बंगाल येथील मिडीनपोरमधील माहिशदल परिसरात राहाणारा देवकुमार हा सचिनच्या वांद्रे येथील निवासस्थानी फोन करून सारा तेंडुलकर हिला विवाहासाठी मागणी घालत होता. ‘जर तू नकार दिलास, तर तुझे अपहरण करीन,’ असे तो फोनवरून धमकावत होता. सुरुवातीला तेंडुलकर कुटुंबीयांनी या फोनकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, वारंवार फोन येत असल्याने, अखेर त्यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार नोंदविली. देवकुमारने अखेरचा फोन २ डिसेंबरला केला होता. सारा तेंडुलकरने लेखी तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी कॉल रेकार्ड तपासले असता, हे फोन पश्चिम बंगालमधील मिडीनपोर या जिल्ह्यातून येत असल्याचे समजले. त्या ठिकाणी पथक पाठवून देवकुमारला शनिवारी अटक केली.डायरीत सापडले साराचे फोटो-देवकुमारच्या डायरीमध्ये पोलिसांना सारा तेंडुलकरचे फोटो सापडले आहेत. त्याने तिला प्रत्यक्षात कधीही बघितले नसले, तरी तिच्याबाबत तो फारच ‘सीरियस’ होता.पोलिसांकडून चौकशी -देवकुमारने महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले असून, तो बेरोजगार आहे. त्याच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्याने सचिनचे लँडलाइन फोन नंबर कसे मिळविले, त्याने अशा प्रकारे आणखी कोणत्या ‘सेलिब्रिटी’ला त्रास दिला आहे का, याबाबत त्याच्याकडे तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.ट्रान्झिट रिमांड-देवकुमारला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प. बंगालमधील स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSachin Tendulkarसचिन तेंडूलकर