गेवराई (जि़ बीड) : तालुक्यातील एरंडगाव शिवारात २७ वर्षीय विवाहितेवर शुक्रवारी चौघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जीजा राठोड (३५) आणि अमोल काष्ठ (३०) या दोघांना ताब्यात घेतले असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.पाचेगाव शिवारात कापूस वेचून ही विवाहिता सायंकाळच्या सुमारास जीपमध्ये बसून बीडकडे निघाली होती. चारजणांनी जीप बीडकडे घेऊन जाण्याऐवजी एरंडगाव शिवाराकडे वळविली. त्यानंतर याच शिवारात तिच्यावर बलात्कार केला़ त्यानंतर तेथून ते पसार झाले. स्वत: महिलेनेच ही माहिती शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना सांगितल्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी जीजा आणि अमोल या दोघांना ताब्यात घेतले आहे. आणखी दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)चाळीसगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचारचाळीसगाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी आरोपीला २ रोजी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव संभाजी सुदाम जाधव (रा.पिंपरखेड) असे आहे. गावातीलच संभाजी जाधव या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याबाबतची फिर्याद मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव पोलिसात दिली होती. तक्रारीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली़ सामूहिक आत्महत्याप्रकरणातील महिलेचा मृत्यूच्अकोला : उरळजवळील मोरझाडी येथील मोरखडे कुटुंबातील पाच जणांनी गुरुवारी सकाळी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सर्वांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु शुक्रवारी सायंकाळी ५च्या सुमारास रेखा अनिल मोरखडे (४५) यांचा मृत्यू झाला. च्बाळापूर तालुक्यातील मोरझाडी येथील अनिल बाबाराव मोरखडे (५७), रेखा अनिल मोरखडे (४५), धीरज अनिल मोरखडे (२0), आधार ऊर्फ सुरज अनिल मोरखडे(१८) आणि प्रीती अनिल मोरखडे (१५) यांनी गुरुवारी सकाळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या पाचही जणांना सुरुवातीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते; परंतु त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले. पैकी तिघांची प्रकृती गंभीर होती. च्एकाच कुटुंबातील हे पाचही सदस्य मृत्यूशी झुंज देत होते. शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास यातील रेखा अनिल मोरखडे हिचा मृत्यू झाला. उर्वरित चौघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
गेवराईमध्ये सामूहिक बलात्कार
By admin | Updated: January 3, 2015 01:32 IST