शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मसाला व्यापाऱ्यांकडे साठा परवाना नाही

By admin | Updated: June 29, 2016 02:22 IST

अतिक्रमणामुळे चर्चेत असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला व्यापारी पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- अतिक्रमणामुळे चर्चेत असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला व्यापारी पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत. पालिकेकडून साठा परवाना न घेताच व्यापार केला जात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणी व्यापाऱ्यांना नोटिसी पाठविल्या असून १५ दिवसांमध्ये परवाना न घेतल्यास गाळे सील करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व व्यापारी पालिकेच्या परवानग्या न घेताच नियमबाह्य बांधकाम व व्यवसाय करत आहेत. पालिकेच्या अधिकार क्षेत्रात नसल्याप्रमाणे येथील कामकाज सुरू आहे. २५ वर्षांमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. बांधकाम करताना कोणत्याही अधिकृत परवानग्या व्यापाऱ्यांनी घेतलेल्या नाहीत. परंतु व्यापाऱ्यांच्या दबावगटामुळे आतापर्यंत त्यांच्यावर काहीच कारवाई होत नव्हती. आयुक्तपदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होताच त्यांनी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांच्या नियमबाह्य गोष्टींविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. प्रथम मसाला मार्केटमधील अतिक्रमणावर कारवाई सुरू करून जवळपास ३१ गाळे सील केले होते. मार्केटमध्ये मसाल्याच्या पदार्थांचा साठा करताना पालिकेकडून साठा परवाना घेणे बंधनकारक आहे. परंतु १९९१ पासून येथील ६६० पैकी एकाही व्यापाऱ्याने हा परवाना घेतलेला नाही. परवान्यासाठी प्रत्येक वर्षी ५ ते १० हजार रूपये शुल्क येवू शकते. मसाला व्यापाऱ्यांसाठी हे शुल्क अगदीच क्षुल्लक असूनही ते भरले जात नाही. यामुळे पालिकेचे वर्षाला तीस लाखांपेक्षा जास्त नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनी तत्काळ साठा परवाना घ्यावा यासाठी नोटीस पाठविण्याचे आदेश आयुक्तांनी परवाना विभागाला दिले आहेत. सहायक आयुक्त व मुख्य बाजार व परवाना अधिकारी दत्तात्रय नांगरे यांनी व्यापाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३७६ अन्वये या नोटीस दिल्या आहेत. मसाला पदार्थांचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना महापालिका अधिनियम ३७६ च्या प्रकरण १८ मधील भाग १ व ३ नुसार साठा परवाना घेतला पाहिजे. व्यापाऱ्यांनी हा परवाना घेतला नसल्याने त्यांचा व्यवसाय बेकायदेशीर ठरत आहे. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांच्या आतमध्ये जर परवाने घेतले नाहीत तर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये दिला आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या गाळ्यांचा वापर करण्यापासून थांबविले जाईल व आवश्यकता वाटल्यास गाळे सील केले जातील असे स्पष्ट केले आहे. व्यापाऱ्यांनी तत्काळ सीबीडी बेलापूरमधील महापालिकेच्या मुख्यालयामध्ये परवाना विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. अतिक्रमण वाचविण्यासाठी धावपळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पुन्हा नवीन परवान्यासाठी पालिकेकडे जावे लागणार असून दुर्लक्ष केल्यास कारवाईची शक्यता आहे. >पालिकेचे वर्षाला ३० लाखांचे नुकसान साठा परवान्यासाठी चौरस फुटाप्रमाणे वर्षातून एकदाच शुल्क भरावे लागते. मसाला मार्केटमधील ६६० पैकी १५४ चौरस मीटरचे ५९८ मोठे गाळे आहेत. याशिवाय १०९ चौरस मीटरचे ६२ गाळे आहेत. प्रत्येक गाळ्यासाठी वर्षाला जास्तीत जास्त ५ ते १० हजार रूपये शुल्क येवू शकते. वर्षाला परवान्याच्या माध्यमातून जवळपास ३० लाख रूपयांचा महसूल प्राप्त होवू शकतो. २४ वर्षांपासून हा महसूल बुडाला असून यापुढे परवाना घेतला तरच व्यापार करता येईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंढेंचा पुन्हा दणका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या सूचनांचे कधीच पालन केले नाही. तीन वर्षांपूर्वी नोटीस पाठवूनही अतिक्रमण थांबविण्यापेक्षा दुप्पट वेगाने बांधकामे सुरूच ठेवली. सेससाठी दप्तर तपासणी करण्यासही यापूर्वी अडथळे निर्माण केले होते. परंतु तुकाराम मुुंढे यांनी कायद्यावर बोट ठेवून व्यापाऱ्यांची मनमानी मोडीत काढली आहे. प्रथम अतिक्रमणावर कारवाई सुरू केल्यानंतर आता साठा परवाना घ्या, नाहीतर कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याने व्यापाऱ्यांना हा दुसरा मोठा दणका मानले जात आहे.