शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

शहीद जवान नितीन कोळी अनंतात विलीन

By admin | Updated: October 31, 2016 11:41 IST

चकमकीत शहीद झालेले सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत 

सांगली, दि.31 - जम्मू काश्मीर येथील कुपवाड्यामध्ये शहीद झालेले जवान नितीन कोळी यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मूळगावी दुधगावात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  नितीन कोळी यांचा भाऊ आणि मोठा मुलगा देवराज कोळीने नितीन कोळी यांना मुखाग्नी दिला. शहीद जवान नितीन कोळी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. 'नितीन कोळी अमर रहे'च्या घोषणा दिल्या जात होत्या.  
 
अंत्यसंस्कारासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील,  राज्यमंत्री सदाभाऊ खोत,  सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार राजू शेट्टी, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार जयंत पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे उपस्थित होते. दरम्यान, यावेळी दुधगाव-खोची नवीन पुलाला शहीद नितीन कोळी यांचे नाव देणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. 
 
रविवारी रात्री शहीद नितीन सुभाष कोळी यांचे पार्थिव दुधगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झाले होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव कर्मवीर चौकात ठेवण्यात आले होते. दुधगावात प्रत्येक चौकात नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहणारे फलक ग्रामस्थांनी उभारले होते. कर्मवीर चौकात अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.      
  
 
यानंतर आज सकाळी दुधगाव येथे वारणा नदीकाठी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी हे शुक्रवारी रात्री शहीद झाले. त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त समजताच दुधगावमध्ये शोककळा पसरली. ग्रामस्थांनी शोकसभा घेऊन, दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन, आज सोमवारपर्यंत दुखवटा पाळला आहे. रविवारी कवठेपिरान, सावळवाडी व माळवाडी या तीन गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला.
 
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
शहीद नितीन कोळी यांना देवराज (वय ४ वर्षे) व युवराज (२ वर्षे) अशी दोन मुले आहेत. युवराजच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी वीर सेवा दल मध्यवर्ती समिती संचलित लिटल स्टार इंग्लिश मेडियम स्कूलने घेतली आहे. सध्या देवराज हा याच स्कूलमध्ये लहान गटात शिक्षण घेत आहे.

कोळी कुटुंबीयांना आर्थिक मदत

शहीद जवान नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 15 लाख रुपयांची तर सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे कोळी कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.