शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीसमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार, वर्ध्यातील संतापजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:30 IST

आरोपी फरार झाल्यानंतर, पीडितेच्या पतीने देवळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, हे प्रकरण सावंगी पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर सावंगी पोलिसांनी तत्काळ संबंधित फार्महाऊसवर पोहोचत पंचनामा केला.

ठळक मुद्देपीडितेला नोकरीचे आमिष दाखवून मुलखतीच्या बहाण्याने सिंदी (रेल्वे) येथून सावंगी (मेघे) येथे बोलावण्यात आले होते.पीडितेवर एकापाठोपाठ एक करून सहाही नराधमांनी बलात्कार केलाअटक करण्यात आलेल्या सर्वंना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

वर्धा - नोकरीचे आमिष दाखवत एका विवाहितेवर पती समोरच सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी  गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि सर्व सहाही आरोपींना अटक केली आहे. येथील एका फार्महऊसवर ही घटना घडली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला नोकरीचे आमिष दाखवून मुलखतीच्या बहाण्याने सिंदी (रेल्वे) येथून सावंगी (मेघे) येथे बोलावण्यात आले होते. यानंतर तिला आणि तिच्या पतीला येथून सेलुसरा येथे एका फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे आधीपासूनच सहा जण टपून बसले होते. तेथे गेल्यानंतर तिच्या पतीला बाहेरच थांबवण्यात आले आणि तिला आत बोलावण्यात आले. घडत असलेल्या प्रकाराची शंका येताच पतीने विरोध केला. यावर आरोपींनी त्याला धमकावले आणि बाहेरच पकडून ठेवले. यानंतर पीडितेवर एकापाठोपाठ एक करून या सहाही नराधमांनी बलात्कार केला आणि ते घटना स्थळावरून फरार झाले. घटनेनंतर आरोपींनी महिला आणि तिच्या पतीला यासंदर्भात कुठेही बोललात तर ठार करू अशी धमकीही दिली होती. 

याप्रकरणी, होमराज बाबाराव भोयर (वय 39, रा. धारपुरे ले-आउट सिंदी (मेघे), लोकेश ऊर्फ अभिजित गजानन इंगोले (वय 24, रा. तुकाराम वॉर्ड), शेखर सुरेश चंदनखेडे (वय 24, रा. पवनार), नितीन मारोतराव चावरे (वय 27, रा. खरांगणा (गोडे)), राहुल बनराज गाडगे (वय 28, रा. खरांगणा (गोडे)) तसेच पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (वय 26, रा. सिंदी (मेघे), यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

तत्पूर्वी, आरोपी फरार झाल्यानंतर, पीडितेच्या पतीने देवळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, हे प्रकरण सावंगी पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर सावंगी पोलिसांनी तत्काळ संबंधित फार्महाऊसवर पोहोचत पंचनामा केला. यावेळी देवळी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार