शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

आईच्या खुन्याला विवाहित तरुणीने यमसदनी धाडले

By admin | Updated: November 3, 2016 20:48 IST

घरा शेजारील बाभळीच्या झाडाच्या वादातून महिलेचा खून झाला. या खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून आरोपीचा दबाव होता. अखेर हा दबाव झुगारत या वृद्धेच्या

ऑनलाइन लोकमत

सोनखास, दि. 03 - घरा शेजारील बाभळीच्या झाडाच्या वादातून महिलेचा खून झाला. या खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून आरोपीचा दबाव होता. अखेर हा दबाव झुगारत या वृद्धेच्या विवाहित मुलीने त्या खुनातील आरोपीला यमसदनी धाडले. ही घटना यवतमाळ-दारव्हा रोडवरील तिवसा गावात बुधवारी सायंकाळी घडली. लाडखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. बाळू थावरू चव्हाण (२३) रा.तिवसा ता.यवतमाळ असे मृताचे नाव आहे. पाच महिन्यांपूर्वी तिवसा येथे बाभळीच्या झाडावरून बाळूचा शेजारी राहणाऱ्या उर्मिला यशवंत धवने (५०) या महिलेसोबत वाद झाला. या वादात मारहाणीत उर्मिला ठार झाली. या प्रकरणी बाळू चव्हाणविरुद्ध लाडखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, तो जामिनावर सुटून आला. त्यानंतर खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून उर्मिलाची मुलगी रंजना सीताराम राठोड (३०) रा.तिवसा हिच्यावर दबाव आणत होता. या दबावातूनच गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये खटके उडत होते. बुधवारी सायंकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मात्र रक्तरंजीत भांडणात झाले. रागाच्या भरात रंजनाने काठीने बाळूला जबर मारहाण केली. काठीचा घाव बाळूच्या वर्मी बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ व नंतर नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी लाडखेड पोलिसांनी रंजनाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी बाळूचा मृत्यू झाल्याने तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ठाणेदार नरेश रणधीर, फौजदार रवी वावळे, जमादार गजानन शेजूळकर तपास करीत आहे.