शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितासोबत संबंध बलात्कार नाही

By admin | Updated: January 13, 2015 05:04 IST

विवाहित पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणारी महिला त्याने बलात्कार केल्याचा दावा करू शकत नाही, असे मत व्यक्त करीत उच्च न्यायालयाने त्या पुरुषाविरोधात महिलेने केलेली तक्रार रद्द केली़

मुंबई : विवाहित पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणारी महिला त्याने बलात्कार केल्याचा दावा करू शकत नाही, असे मत व्यक्त करीत उच्च न्यायालयाने त्या पुरुषाविरोधात महिलेने केलेली तक्रार रद्द केली़या प्रकरणातील महिला सज्ञान आहे व तिला तो पुरुष विवाहित असल्याचे ज्ञात होते़, असे असतानाही ती त्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती़ त्या पुरुषाने तिला विवाहाचे आमिष दाखवून आपल्या वासनेची भूक भागवून घेतली किंवा तिला खोटे आश्वासन दिले नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते़ त्यामुळे या दोघांमधील शारीरिक संबंध हे तिच्या संमतीनेच झाले असावेत, असे पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीतून दिसून येत असल्याचे निरीक्षणही न्या़ रणजित मोरे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने व्यक्त केले़ या महिलेने अ‍ॅड़ महेश वासवानी यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती़ पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्याशी विवाह करेन, असे आमिष दाखवून त्याने बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने कफ परेड पोलिसांत केली होती़ मात्र आता उभयतांमध्ये तडजोड झाली असल्याने ही तक्रार रद्द करावी, अशी मागणी या महिलेनेच याचिकेत केली होती़ अ‍ॅड. वासवानी यांच्यासोबत अ‍ॅड. धारिणी नागदा, अ‍ॅड. अनुश्री कुलकर्णी यांनी महिलेच्या वतीने युक्तिवाद केला.बलात्कार हा गंभीर गुन्हा असून त्याची तक्रार सहज रद्द करणे योग्य नाही़ पण उभयतांमध्ये तडजोड झाल्याने ही तक्रार रद्द केली जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले़ आरोपी आणि त्याची पत्नी यांच्यावतीने अ‍ॅड. निरंजन मुंदरगी यांनी काम पाहिले, तर सरकारी वकील जं. पी. याज्ञिक यांनी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)