शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जागेअभावी रस्त्यावरच बाजार

By admin | Updated: September 20, 2016 02:08 IST

डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी वाहतूक कोंडीचा उच्चांक पाहण्यास मिळत आहे.

थेरगाव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी वाहतूक कोंडीचा उच्चांक पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनचालकांची आणि पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे.डांगे चौक हा शहरातील महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते़ औंध,रावेत, चिंचवड, हिंजवडी, तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अशा विविध ठिकाणी जाणारे रस्ते या चौकात मिळतात. या सर्व ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त आहे. याच चौकात रविवारचा मोठा आठवडे बाजार भरतो. या बाजारादिवशी अनेक विक्रेते रस्त्यावरच दुकान थाटतात. त्यामुळे वाहनचालकांना या गर्दीत मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागते. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होते. गेल्या महिन्यात अतिक्रमण कारवाईच्या विरोधात व्यावसायिकांनी रास्ता रोको केला. अधिकाऱ्यांनी रस्त्यावर दुकाने न थाटण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर दोन आठवडे बाजार भरला नसल्याने वाहतूक सुरळीत होती़ मात्र, गेल्या आठवड्यापासून पुन्हा बाजार रस्त्यावरच भरत आहे़ डांगे चौकातील चारही रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे़ आयटी हब, शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे, गृहप्रकल्प, पुणे शहराला जोडणारा औंध रस्ता आणि पिंपरी-चिंचवडनगरीकडे जाणारा मार्ग यामुळे डांगे चौकाला दळणवळणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत असते़ त्यामुळे या चौकातील अतिक्रमण आणि वाहतूककोंडीवर कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूक पोलीस यंत्रणेवर याचा प्रचंड ताण पडत आहे. याच चौकात औंधकडे जाणाऱ्या बसथांब्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून अतिक्रमण होत आहे. त्यामुळे या थांब्यावर पीएमपी थांबवणे वाहनचालकांना कठीण होत आहे. बसथांब्याच्या पुढे बस थांबवावी लागत असल्याने वृद्ध नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच बस पकडण्याच्या घाईत अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या रिक्षांवर कारवाई करून बस स्थानके प्रवाशांसाठी उपलब्ध करावीत. सकाळी व संध्याकाळी हिंजवडीमधील अनेक कंपन्या भरण्याची व सुटण्याची वेळ असते. या वेळेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या बसगाड्या या चौकातून जात असतात. तसेच लहान मोटारींचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. वाहतूक पोलीस या चौकात उपस्थित नसल्याचे पाहून अनेक वाहनचालकांकडून सिग्नलचे उल्लंघन केलेले पहायला मिळते.या चौकातून सांगवी-किवळे बीआरटी मार्ग जातो. इतर वाहनचालकांनी सिग्नलचे उल्लंघन केले तर बीआरटी बसगाड्यांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंचवडकडे जाणाऱ्या बसगाड्यांसाठी असणारा बसथांबा रिक्षा आणि हातगाड्यांनी गिळंकृत केला होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारींमुळे या बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. अशीच कारवाई इतर बसस्थानकाबाबत करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)>मागणी : मंडईसाठी स्वतंत्र जागा द्यावी डांगे चौकातील भाजीमंडईचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. पुनावळे, रावेत, किवळे, ताथवडे, वाकड, हिंजवडी या गावांमधून शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी डांगे चौकातील आठवडेबाजारामध्ये आणत असतो. या आठवडे बाजाराला उपनगरातील लोक मोठ्या संख्येने भाजी खरेदीसाठी येत असतात. मात्र, स्वतंत्र भाजीमंडई नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरच दुकान थाटावे लागत आहे. अनेक वेळा रावेतकडे जाणारा मार्गच या बाजारामुळे जवळ जवळ बंद होतो. पुलाच्या बाजुने रावेत, किवळेकडे जाणाऱ्या वाहनांना या गर्दीतूनच वाट काढावी लागते. जास्त गर्दी असल्याने अनेक वेळा वाहनांचा धक्का नागरिकांना लागून वादा-वादीचे प्रसंगही ओढवतात. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या समस्येचा गांभीर्याने विचार करावा व आठवडे बाजारासाठी स्वतंत्र भाजीमंडईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही.