शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

मर्दानी नार मी... भिणार नाय कोणाला गं!

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

पथनाट्याद्वारे जनजागृती : वाहता बसस्थानक परिसर पंधरा मिनिटांसाठी झाला स्तब्ध

सातारा : ‘मर्दानी नार मी, भिणार नाय कोणाला गं’ असं म्हणत सातारच्या तरुणी आज अक्षरश: रस्त्यावर उतरल्या. पथनाट्याच्या माध्यमातून इतर मैत्रिणींना बेधडक जगण्याचा संदेश देत त्यांनी ‘लोकमत’च्या मोहिमेला वेगळी उंची दिली.एसटी स्टॅण्ड परिसर तसा कायमच गजबजलेला... पण संध्याकाळची वेळ म्हणजे वारूळातून मुंग्या बाहेर पडल्यासारखी गर्दी... बुधवार संध्याकाळी मात्र ही गर्दी तब्बल पंधरा मिनिटांसाठी थांबली. खदखदून हसणं, शिट्या आणि स्तब्धता अशा वातावरणात येणाऱ्या-जाणाऱ्यांनी पथनाट्य अनुभवले. ‘महिला म्हणून जगताना महिला असल्याचा अभिमान बाळग... कोणी तिरकस नजर टाकली तर त्याला निक्षून जाब विचार... ऊठ आता लढायला शीक,’ असं म्हणत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज पथनाट्याद्वारे एसटी स्टॅण्ड परिसरात जनजागृती केली. साताऱ्यात रात्रीच्या वेळी महिला सुरक्षित आहेत का, याविषयी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महिलांची सुरक्षितता हा विषय चांगलचा ऐरणीवर आला होता. त्यानंतर समाजातील विविध स्तरातून याविषयी आवाज उठविला गेला. ‘मर्दानी नार मी... भिणार नाही कुणाला गं..’ या वाक्याने पथनाट्याची सुरूवात झाल्यानंतर पुढील पंधरा मिनिटे स्टँण्डवर केवळ या पथनाट्याचा आवाज गुंजला. पथनाट्याचे दोन भाग करून छेडछाडीला भिण्यापेक्षा सबळ होण्याचा संदेश देण्यात आला. (प्रतिनिधी)पथनाट्याने केली वातावरण निर्मितीमुख्य बसस्थानक परिसरात संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अनेकांची घरी जाण्याची घाई असल्यामुळे या परिसरात कोणाला कोणाकडे पाहायलाही वेळ नसतो. पण बुधवारची संध्याकाळ त्याला अपवाद ठरली. घराच्या ओढीने लगबगीने बसस्थानकात जाणारी पावले थबकली ती पथनाट्य पहायला आणि ऐकायला! जिल्ह्यातील विविध कोपऱ्यातून आलेल्या अनेक प्रवाशांनी आवर्जून थांबून हे पथनाट्य पाहिले. यात यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय जकातवाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात उमेश काळे, अभिजित जाधव, सुशांत जाधव, दत्तात्रय कोळेकर, साईनाथ गांगोडे, झिम्माराणी बीडगर, सायली अडसुळे, प्रियांका अपशिंगे, मंगेश सोनवलकर यांनी सहभाग घेतला. अरुण जावळे यांनी या पथनाट्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.