शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

येत्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 20:12 IST

कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़.  येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्या इशारा हवामान विभागाने दिला

पुणे, दि. 19 : कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़.  येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्या इशारा हवामान विभागाने दिला आहे़ हर्णे येथे गेल्या ३२ तासात तब्बल ५२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

अरबी समुद्रात दक्षिण गुजरात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून गोवा ते कर्नाटक किनारपट्टी परिसरात हवेचा कुंड तयार झाला आहे़ त्याचा परिणाम होऊन कोकण, गोवा, गुजरात परिसरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे़ त्याचवेळी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, झारखंड, छत्तीसगड, सिक्कीम, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालंड, मणीपूर, मेझोराम, त्रिपुरा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात दोडामार्ग, महाड, पणजी, रामेश्वर, रत्नागिरी, साकेलम, वैभववाडी ९०, खेड ८०, डहाणु, देवगड, लांजा ७०, फोंडा, वाल्मोई ६०, अलिबाग, दाभोलीम, माणगाव, श्रीवर्धन ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़मध्य महाराष्ट्रात राधानगरी, साक्री ७०, आजरा, चांदगड, पन्हाळा, सिन्नर ५०, जावळी, मेधा, पाटण, वेल्हे ४०मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात फुलंब्री, सिल्लोड २०, भोकरदन, सोलेगाव १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात मूलचेरा ५०, मौदा ४०, नागभीर ३०, बार्शी टाकळी २०, अकोला, बल्लारपूर, चिखलदरा, कामठी, मोटाळा, नांदगाव, काजी, पाटुर, सालेकसा, सिरौंचा १० मिमी पाऊस पडला़मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत (कुलाबा) तब्बल १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सांताक्रुझला ३५, अलिबाग ३१, रत्नागिरी ९३, पणजी ७, डहाणु ९, महाबळेश्वर ९३, पुणे १९़८, कोल्हापूर ६, सांगली २, सातारा २९, गोंदिया २, नागपूर ०़४, यवतमाळ ४४ मिमी पावसाची नोंद झाली होती़

येत्या २४ तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ २१ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़हर्णे येथे सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठ या २४ तासात तब्बल ३७३ मिमी पावसाची नोंद झाली़ दर तीन तासांनी पडलेला पाऊस, सकाळी ८़३० - ६८, सकाळी ११़३० - ११, दुपारी १४़३० - १३२, सायंकाळी १७़३० - १५५़८, रात्री २०़३० - १५९़८, रात्री २३़३० - १६०़८, पहाटे २़३० - १६३, सकाळी ५़३० - २१३, सकाळी ८़३० - ३७३ मिमीहर्णे येथे मंगळवार सकाळपर्यंत ३७३ मिमी आणि सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५६ मिमी पाऊस झाला आहे़ मागील ३२ तासात ५२९ मिमी पाऊस झाला आहे़

हर्णे येथे सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच पर्यंत १२१ मिमी पाऊस पडला

मंगळवारी सकाळी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत या तीन तासात १६० मिमी पाऊस झाला़सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सायंकाळी साडेपाच या ३२ तासात महाबळेश्वर येथे २१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़मंगळवार सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिमी)हर्णे ३७३, वाकवली २९०, दापोली २६०, चिपळूण २२०, मूलडे १८०, कणकवली, मंडणगड १४०, मालवण १३०, राजापूर १२०, गुहागर, पेडणे, संगमेश्वर, देवरुख, सावंतवाडी, वेंगुर्ला ११०, म्हापसा १००, महाबळेश्वर १२०, गगनबावडा १००