शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

मराठवाडा-विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता

By admin | Updated: May 6, 2017 12:17 IST

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.  पाऊस व गारपिटीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.  
 
राज्यात उष्णतेचा कहर सुरू असताना अवकाळी पावसाने तोंड वर काढले आहे. सांगली व मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गारपिटीचा तडाखा बसत आहे.  काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसात द्राक्ष बाग, शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली.  
 
लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे.  यामुळे शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवलेल्या ज्वारी खळ्यांचे नुकसान झाले असून उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून तीन दुभती जनावरे दगावली. दरम्यान, स्कायमेटनं शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर रात्री पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला.
पंचांगाप्रमाणे या वर्षी चांगला; परंतु अनियमित पाऊस!)
पुण्यातील भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले. तर सांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तिकडे चिपळूणमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. 
 
(यंदा समाधानकारक पाऊस! भारतीय हवामान खात्याचा अंदाज)
यंदाच्या वर्षी देशातील पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवलेल्या मान्सूनच्या अंदाजाशी मिळताजुळता आहे. स्कायमेटने या वर्षी सरासरी 95 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. 
 
भारताची 60 टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते.  यंदा पर्जन्यमानाच्या दृष्टीने भारतासाठी हे वर्ष सर्वसामान्य वर्ष असेल. संपूर्ण देशभरात चांगला पाऊस होईल. यावर्षी देशाच्या वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 
 
याआधी स्कायमेटचा यंदाच्या पर्जन्यमानाबाबतचा अंदाज प्रसिद्ध झाला होता.  जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या 95 टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने वर्तवली होती. त्यात 5 टक्के कमी अधिक फरक पडू शकतो.  देशभरात 887 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली होती.