शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मराठावाडा साहित्य संमेलन: उद्या कोठे काय.... 25 डिसेंबर रोजीचे कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 13:39 IST

दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे.

अंबाजोगाई : उद्या (दि.24) संमेलनाच्या दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता स्वामी रामानंद सभागृह येथे प्रख्यात साहित्यीक चंद्रकांत पाटील यांच्या प्रकट मुलाखतीने होणार असून रणधीर शिंदे (कोल्हापूर), आसाराम लोमटे (परभणी), आणि तुषार बोडखे (औरंगाबाद) हे त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर सकाळी ११ वाजता याच सभागृहात "ग्रामीण शिक्षण : समस्या आणि उपाय" या विषयावरील परिसंवाद होणार असून या परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानी मावळते अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणाचे अभ्यासक प्राचार्य जनार्दन वाघमारे हे राहणार असून या परिसंवादात पुरुषोत्तम भापकर (औरंगाबाद), नंदकुमार नेत्रम वर्मा (मुंबई),कुलगुरू बी.एश. चोपडे (औरंगाबाद), गोविंद नांदडे (पुणे), डॉ. सुरेश खुरसाळे (अंबाजोगाई) आणि अमर हबीब (अंबाजोगाई) यांचा सहभाग राहणार आहे. या परिसंवादाचे प्रास्ताविक शशीकांत हिंगोणेकर हे करणार आहेत.दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे. या परिचर्चेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक प्रा. भास्कर चंदनशीव हे राहणार आहेत तर प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव (परभणी), ज्योती कदम (नांदेड), प्राजक्ता सोनवणे (केज), रुषीता लाहोटी (गेवराई) आणि प्रकाश भुते (गेवराई) हे सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाचे संचालन विविध शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनामुळे सतत चर्चीत असलेल्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या करणार आहेत तर आभार मुजीब काजी हे मानणार आहेत.  दुपारी २ वाजता "गझल संमेलन" या अभिनव उपक्रमाचे आयोजन भगवानराव लोमटे सभागृहात करण्यात आले असून या गझल संमेलनाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील प्रख्यात गझलकार डॉ. इकबाल मिन्ने हे राहणार असून मराठवाड्यातील ३३ प्रतिथयश गझलकारांसह इलाही जमादार (पुणे), वैभव जोशी (पुणे), राधा भावे (गोवा), चित्तरंजन भट (पुणे) या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.     दुपारी २ वाजता सर्वद्न्य दासोपंत सभागृहात " मराठवाड्याच नाटक : काल आणि आज" या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून प्रख्यात नाट्यकर्मी प्रा. केशल देशपांडे हे या परिसंवादाच्या अध्यक्षतेस्थानी राहतील. या परिसंवादात दिलीप घारे(औरंगाबाद), प्रकाश त्रिभुवन (औरंगाबाद), रविंद्रकुमार झिंगरे ( परभणी), स्वाती देशपांडे (औरंगाबाद) आणि सतीष साळुंके (बीड) यांचा सहभाग राहणार आहे. सायंकाळी ४ वाजता याच सभागृहात "कवींची वाढती संख्या बाळसं की सुज !" या विषयावरील परिसंवाद प्रख्यात कवी डॉ. केशव तुपे (औरंगाबाद) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या परिसंवादात डॉ. राजशेखर शिंदे (सोलापूर), कृष्णा किंबहुणे (मुंबई), सुरेशकुमार वैराळकर (पुणे), संजिवणी तडेगांवकर (जालना), पी. विठ्ठल (नांदेड), समिता जाधव (औरंगाबाद) आणि रामचंद्र काळुंखे (औरंगाबाद) यांचा सहभाग राहणार आहे.   सायंकाळी सहा वाजता भगवानराव लोमटे सभागृहात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष दैनिक सकाळ (औरंगाबाद) आवृत्तीचे संपादक संजय वरकड हे राहणार असून यामध्ये मराठवाड्यातील निमंत्रित कवींचा सहभाग राहणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता या संमेलनाचे सुप वाजणार आहे.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीड