शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

मराठमोळा गुढीपाडवा

By admin | Updated: March 28, 2017 05:22 IST

मराठी कालदर्शिके नुसार चैत्रमहिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासूनच नववर्षाची सुरु वात होते.

मराठी कालदर्शिके नुसार चैत्रमहिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासूनच नववर्षाची सुरु वात होते. या दिवशी घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. मंगल्याचे प्रतीक असलेली गुढी घरोघरी उभारली जाते. या नववर्षाचे स्वागत सारे जण विविध पध्दतीने करतात, मात्र गुढी ही प्रत्येकाच्या घरी उभारली जाते. गोड-धोडाची चंगळ असते. कोणत्याही शुभकार्याची सुरु वात या दिवसापासून के ली जाते. गुढीपाडवा हा सण सेलिब्रेटी कसा साजरा करतात हे आपण पाहू....संस्कार आणि परंपरा कायममराठी नवीन वर्षाचे आजकाल ज्या पद्धतीने स्वागत केले जाते, ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि त्यात असणारा तरु णांचा सहभाग लक्षणीय असतो. त्यामुळे आजच्या तरु णांपासून मराठी संस्कृती दुरावली जात आहे, ती केवळ ओरडच आहे असे मला वाटते. जरी शिक्षणाचे माध्यम बदलले तरी सुद्धा जो मराठी संस्कार आहे; जी संस्कृती आहे ती तशीच कायम राहील याची मला खात्री आहे. ज्या परंपरागत पद्धतीने गुढी उभारली जाते, त्याच पद्धतीने मी सुद्धा गुढीपाडवा साजरा करतो. यंदा माझे शंभूराजे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याने, यंदाच्या पाडव्याला मी त्या नाटकाच्या तयारीत असेन.-अमोल कोल्हे, अभिनेताचैत्रपाडव्याची निसर्गरम्यता...चैत्राच्या काळात मला सगळ्यात जास्त भावते, ती निसर्गाने टाकलेली कात. पानगळ सरून कोवळ्या पालवीसह ऐन तारु ण्याच्या रसरशीत चैतन्याने न्हाऊन निघालेली रंगीबेरंगी झाडे. गुलजारसाहेबांच्या कवितेप्रमाणे सावळ्या लैलाने भांगात केशरी सिंदूर ल्यावा तसा चैत्रात शेंदरी फुलांनी फुललेला गुलमोहर मला खूप भावतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. दरवर्षी यावेळी माझ्या कुठल्या ना कुठल्यातरी नवीन नाटकाच्या लेखनाची प्रक्रि या सुरू असते. यावर्षीही सुरू आहे. पण दोन वर्षांपूर्वींचा पाडवा माझया कायम स्मरणात राहील. कारण त्या दिवशी माझ्या परफेक्ट मिसमॅच या नाटकाचा पहिला अंक हिमांशू स्मार्तने लिहून पाठवला होता आणि माझ्या कुटुंबियांनी त्या स्क्रि प्टचे पूजन केले होते. बहुतेक निसर्गातील सृजनोत्सवाचा तो परिणाम असावा. कारण पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत परफेक्ट मिसमॅच ने वर्षातल्या सगळ्या पुरस्कारांवर मोहोर उमटवली होती. यावर्षी मात्र निसर्ग थोडा वेगळाच भासतोय. निसर्गाविषयी, पर्यावरणाविषयी आपल्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे की काय माहित नाही, पण तो बदललाय. त्यामुळे चैत्रात कडाक्याच्या उन्हातही डोळ्यांना सुखावणारा निसर्ग काहीसा रूसलाय आपल्यावर. आपण सगळे मिळून त्याला पुन्हा खुलविण्याची जबाबदारी घेण्याचा संकल्प करु न यावर्षीची गुढी उभारू या.-किरण माने, अभिनेता

पाडव्याची पुरणपोळी..आमचा गुढीपाडवा पुण्यात असतो. तिथे आम्ही एकत्र राहात असल्याने वेगळीच मजा असते. माझ्या मोठ्या जाऊबाई या सुगरण आहेत. नेहमीच वेगवेगळे पदार्थ त्या करत असतात. मी सुद्धा त्यांच्याकडून बरेच काही शिकत असते. दोन वर्षांपूर्वी पाडव्याला काहीतरी वेगळे करूया, असे मी ठरवले आणि पुरणपोळ्या करण्याचे नक्की केले. अर्थात, माझ्यासाठी ती खूप अवघड गोष्ट होती. म्हणून मी त्यासाठी जाऊबार्इंना फोन केला. मग पुराणासाठी डाळ शिजवली. पण गडबड झाली, कारण ती डाळ कोरडी पडली होती. मग पुन्हा फोन आणि प्रयत्न! त्या नंतर मी मोजून पाच पोळ्या लाटल्या; पण मी पाचशे पोळ्या केल्या असेच मला वाटत राहिले. मग आम्ही त्यावर मनसोक्त ताव मारला. हा गुढीपाडवा माङयासाठी खूप स्पेशल ठरला. तो माझ्या नेहमीच लक्षात राहील.-भक्ती रत्नपारखी, अभिनेत्रीचैतन्यपूर्ण ऊर्जा...खरे सांगायचे तर आमच्या संपूर्ण कुटुंबाची एकच गुढी गावी उभारत असल्याने, इथे मुंबईत आमच्या घरी वेगळी गुढी उभारता येत नाही. परंतु आधी चाळीत राहत असताना घराला लागूनच असलेल्या विठ्ठल मंदिराच्या बाहेर आम्ही सामूहिक गुढी उभारायचो. दरवर्षी त्या विभागातून शोभायात्रा काढली जायची. त्यात सहभागी होण्यात वेगळीच मजा येत असे. पाडव्याच्या दिवशी सगळीकडे चैतन्यपूर्ण वातावरण असते आणि त्यामुळे या नवीन वर्षाच्या पिहल्याच दिवशी एक वेगळीच ऊर्जा मिळते. (जी बहुतेक करून ३१ डिसेंबरमुळे,१ जानेवारीला काही दिसत नाही). या वर्षीचा पाडवा माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण यंदा आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो आहोत. गेले काही वर्षे कलर्स मराठीतर्फे गुढीपाडव्याला सप्रेम भेट येत असते आणि त्यात एक छोटी गुढीसुद्धा असते. आता घरी तीच गुढी उभारतो. जेव्हा जेव्हा व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढणे शक्य होते; तेव्हा तेव्हा कुटुंबासोबतच या नवीन वर्षाचा मी आनंद घेत असतो. -प्रसाद खांडेकर, अभिनेतागप्पांचा गोडवा...गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीतला अत्यंत महत्त्वाचा सण आहे. बाबांचे (श्रीकांत मोघे) या दिवशी कधी प्रयोग नसतील, तेव्हा आमचे काका वगैरे घरी येत असत. मग आमच्या सांस्कृतिक गप्पा व्हायच्या. मी तेव्हा लहान असल्याने या गप्पा मी ऐकत असे. पण गप्पांनी मला समृद्ध केले हे मात्र खरे. बाबांचा गोतावळा खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या मित्रमंडळी अशावेळी मैफलच जमायची. रात्री जेवून-खाऊन सगळे घरी जायचे. त्यामुळे पाडवा हा खूप आनंद देऊन जाणारा सण वाटायचा आणि आजही वाटतो.-शंतनू मोघे, अभिनेताशोभायात्रांचे आकर्षण...आपले काही सण असे आहेत, ज्यांना मी आणि अनुजा आवर्जून घरी पुण्यात असणे पसंत करतो. गुढीपाडवा हा त्यापैकी एक. नवीन वर्षाची सुरु वात स्वत:च्या घरी करायला मला आवडते. पण त्याचबरोबर विविध ठिकाणी निघणाऱ्या शोभायात्रांचे आकर्षण काही वेगळेच असते. त्यातला उत्साह आणि आनंद केवळ अवर्णनीय असतो. एक अप्रतिम शोभायात्रा गिरगावात अनुभवायला मिळाली. -सौरभ गोखले, अभिनेतासंस्कृतीची जोपासना...आज २१ व्या शतकातही आपण आपली परंपरा जपत गुढीपाडवा साजरा करतो हे महत्त्वाचे आहे. गुढीपाडवा म्हटला चैतन्याचे वातावरण आमच्या घरात असते. सकाळी लवकर उठून तोरण बनवण्याची जबाबदारी माझ्यावर असते. नंतर गुढी उभारली जाते. पण त्या गुढीला जी साखरेची माळ लावलेली असते, तिचे मला खूप आकर्षण असते. संध्याकाळी ती साखरेची माळ गळ्यात घालून लहान मुलांसारखी तिचा आस्वाद घेणे मला आवडते. मग त्या साखरेच्या पाकाने माझे तोंड माखलेले असते. पाडव्याला घरात गोडधोड तर असतेच. या दिवशी माङया लाडक्या कार ची मी पूजा करते. आपण आपली संस्कृती जपून ठेवली आहे याचा अभिमान वाटतो. शेजारच्या अमराठी लोकांना आम्ही गुढीचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनीही गुढी उभारायला सुरु वात केली.-शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री