शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडे पाठपुरावा सुरू, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच - राज्यपाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 08:00 IST

मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार, पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी ५ लाख रुपयांची विमाछत्राची योजना राबविण्यात येणार आहे.

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा याकरिता शासन केंद्राकडे पाठपुरावा करत असून,  येत्या काळात अमरावती येथील रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्यपाल रमेश बैस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्ताने २ ते ९ जून या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक १.५० लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. यामध्ये नवीन २०० रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे. राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील किमान ५०० युवकांना जल पर्यटन, कृषी पर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन, साहसी पर्यटन तसेच शाश्वत पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षित केले जाईल.

बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली आहे. यामध्ये केंद्र शासनामार्फत प्रतिवर्षी प्रतिशेतकरी ६ हजार रुपये देत असून, आता राज्य शासनही प्रति शेतकरी ६ हजार रुपये देणार असल्याने शेतकऱ्यांना १२ हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत. 

पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी ५ लाख रुपयांची विमाछत्राची योजना राबविण्यात येणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना आणली आहे. योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर ती १८ वर्षांची झाल्यानंतर ७५ हजार रुपये देण्याची योजना आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास आर्थिक साहाय्याच्या रकमेतही १५ लाख रुपयांवरून २० लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे, असेही राज्यपाल रमेश बैस म्हणाले.