शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्ष निवडणार सर्वसंमतीनेच, यंदापासूनच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 07:00 IST

यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने नाही, तर सर्वसहमतीने निवडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे जाहीर केले.

नागपूर - यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने नाही, तर सर्वसहमतीने निवडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे जाहीर केले.यापुढे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही, असे महामंडळाने यापूर्वीच जाहीर केले होते. तथापि, हा निर्णय पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनापासून लागू होणार होता. मात्र, घटनादुरुस्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्याने यंदापासून अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करीत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. त्यामुळे यवतमाळच्या अध्यक्षपदासाठी १ आॅक्टोबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रियाही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता अध्यक्षपदाची निवड घटक संस्थांनी सुचविलेल्या नावातून होणार आहे. त्यानुसार महामंडळाच्या चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, समाविष्ट संस्थांकडून पाच, संलग्न संस्थांकडून प्रत्येकी एक नाव, संमेलन निमंत्रक संस्थेकडून एक तर विद्यमान संमेलन अध्यक्ष एक नाव, अशी २० नावे सुचविण्यात येणार आहेत. येत्या २८ आॅक्टोबर रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या महामंडळाच्या सभेपर्यंत ही नावे मागविण्यात आली आहेत.बाहेरील संस्थांसाठी दरवाजे खुलेबाहेरील साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. २५ वर्षापासून नोंदणीकृत आणि कार्यरत असलेल्या साहित्य संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून महामंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळासोबत सध्या चार घटक संस्था, पाच समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था आहे.स्वतंत्र वार्षिक अधिवेशनसर्व संस्थांचे एक स्वतंत्र वार्षिक अधिवेशन भरविण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. केवळ साहित्यविषयक गोष्टींचा उहापोह होत होता. त्यामुळे या साहित्य संमेलनात चर्चेला न येणारे महत्त्वाचे व गंभीर विषय तसेच संस्थात्मक विश्वाचे महत्त्वाचे प्रश्न, समस्या, अडचणी आदींवर चर्चा आणि उपाययोजनांवर भर दिला जावा यासाठी वार्षिक अधिवेशन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या