शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

मराठी कादंबरीने दिले प्रभूंच्या प्रश्नाचे उत्तर!

By admin | Updated: February 27, 2015 02:30 IST

वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष आणि तुटपुंजी गुंतवणूक यामुळे गलितगात्र झालेल्या भारतीय रेल्वेचा येत्या पाच वर्षांत पुनर्जन्म घडवून आणण्याचा

वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष आणि तुटपुंजी गुंतवणूक यामुळे गलितगात्र झालेल्या भारतीय रेल्वेचा येत्या पाच वर्षांत पुनर्जन्म घडवून आणण्याचा संकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केला. त्यासाठी काय करावे लागेल, याची रूपरेषाही त्यांनी मांडली. पण हे सर्व साध्य कसे करायचे, असा प्रश्न त्यांनाच पडला. या प्रश्नाचे उत्तर त्यांना परमेश्वराकडूनही मिळाले नाही. शेवटी शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या जुन्या मराठी कादंबरीच्या कथानकात त्यांना याचे उत्तर मिळाले. सह्याद्रीचे कडे पार करून भारतातील पहिला रेल्वे मार्ग कसा बांधला गेला याचे लालित्यपूर्ण वर्णन शुभदा गोगटे यांनी या कादंबरीत केले आहे.यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील संदर्भित उतारा मुळातूनच उद््धृत करणे उद््बोधक आहे. प्रभू म्हणाले..... ‘‘पर मेरे मन मे सवाल उठता है- हे प्रभू, ये कैसे होगा? प्रभू ने तो जवाब नही दिया, तब ये प्रभूने सोचा (यावर सभागृहात हशा पिकतो) की, गांधीजी जिस साल भारत (वापस) आये थे, इनकी शताब्दी वर्ष में भारतीय रेल्वे को एक भेंट मिलनी चाहिये, की परिस्थिती बदल सकती है, रास्ते खोजे जा सकते है, इतना बडा देश, इतना बडा नेटवर्क, इतने सारे रिसोर्सेस, इतनी विशाल मॅनपॉवर, (पंतप्रधान मोदींकडे पाहात) इतनी स्ट्राँग पोलिटिकल विल, तो क्यों नही हो सकता रेल्वे का पुनर्जन्म.....(या प्रश्नाचे उत्तर शोधताना) मला शुभदा गोगटे यांच्या ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या कादंबरीची आठवण झाली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून भारतातील पहिला रेल्वेमार्ग कसा बांधला गेला याचे मार्मिक वर्णन या कादंबरीत आहे. एकावेळी रेल्वेमार्गाचा एक तुकडा बांधायचा. एकावेळी एक बोगदा खणायचा. ते पूर्ण झाले की पुढील रेल्वेमार्ग व बोगद्याचे काम हाती घ्यायचे. मूळ रेल्वेमार्ग जसा थोडा थोडा करून बांधला गेला तसाच रेल्वेचा पुनर्जन्मही टप्प्याटप्प्यानेच करता येईल.