शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाच्या पाटीवर सुरुवातीला मराठी अन् तेही तेवढ्याच ठळक अक्षरात; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विधेयक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 09:32 IST

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील पळवाटीचा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शवला जात होता. मात्र, आता दुकान मोठे असो किंवा लहान  प्रत्येक ठिकाणी मराठी पाटी लावावीच लागेल, अशी तरतूद करीत पळवाट शोधणाऱ्यांना चाप लावण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रत्येक दुकानाच्या पाटीवर सुरुवातीला मराठी नाव लिहावे लागेल आणि इतर भाषेच्या इतक्याच ठळकपणे मराठी नाव लिहिणे अनिवार्य असेल, अशी तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत बुधवारी मंजूर करण्यात आले.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील पळवाटीचा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शवला जात होता. मात्र, आता दुकान मोठे असो किंवा लहान  प्रत्येक ठिकाणी मराठी पाटी लावावीच लागेल, अशी तरतूद करीत पळवाट शोधणाऱ्यांना चाप लावण्यात आला आहे.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये ही महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. याआधी दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकान नियमांतून पळवाट काढत असल्याचे आढळून आले होते. ही पळवाट काढून टाकण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर बुधवारी याविषयीचे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडून त्यावर मंजुरीची मोहोर उमटविली. राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्याजवळच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती केली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या झळकतील, असे सांगताना विधेयकाच्या मंजुरीबद्दल मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी आनंद व्यक्त केला.

  • नामफलकावर सुरुवातीला मराठी मोठ्या अक्षरात असेल तर त्या शेजारी अन्य कोणत्याही भाषेत नाव लिहिण्यास मनाई केलेली नाही.
  • दुकानांच्या नाम फलकावर सुरुवातीला मराठी अक्षरातच दुकानाचे नाव लिहिलेले असावे.
  • मराठी अक्षराचा आकार हा अन्य कोणत्याही भाषेच्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.