शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा धोरण अडकले लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:38 IST

मराठी भाषेचे धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या भाषा सल्लागार समितीने आपला मसुदा सादर करून पाच महिने झाले तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

औरंगाबाद : मराठी भाषेचे धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या भाषा सल्लागार समितीने आपला मसुदा सादर करून पाच महिने झाले तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने जुलै महिन्यात शासनाकडे आपला अहवाल सुपुर्द केला आहे. यासंदर्भात भाषा विभागाकडे विचारणा केली असता, मसुद्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असून, इतर मंत्रालयीन विभागांकडून त्यासंदर्भात अभिप्राय मागविण्यात येणार आहे. याविषयी मुख्य सचिव लवकरच जवळपास ३० विभागांचे प्रधान सचिव व अपर सचिवांची बैठक बोलविण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.सल्लागार समितीने सादर केलेल्या मसुद्यावर सर्व विभागांचे अभिप्राय आल्यानंतर भाषा विभाग अंतिम निर्णय घेणार आहे. शिवाय, विधिमंडळांची मंजुरी घ्यावी लागणार नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जाबाबतचा प्रश्न केंद्र शासनाच्या दरबारी रेंगाळलेला असताना किमान राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेला भाषा धोरणाचा प्रश्न तरी लवकर मार्गी लागेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.मराठी भाषेचा विकास व विविध आघाड्यांवर तिला अभिवृद्ध करण्यासाठी धोरणात्मक चौकट घालून देण्यासाठी २०१० साली न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित केली होती. येत्या २५ वर्षांत मराठी भाषेला सर्व पातळ्यांवर स्थैर्य लाभावे यादृष्टीने उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली होती; परंतु या समितीला न कार्यालय दिले गेले न कर्मचारी. त्यामुळे चपळगावकर यांनी समितीचा राजीनामा दिला. त्यानंतर डॉ. मोरे यांच्याकडे अध्यक्षपद सोपवले होते.समितीचे काम मसुदा तयार करण्याचे होते. ते वेळेत पूर्ण करून आम्ही भाषा विभागाला मसुदा सादर केला आहे. तो मान्य करायचा की अमान्य, याचा निर्णय सरकारने घ्यायचा असल्याचे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठी