शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मराठी मुलगी आइन्स्टाइनहून प्रज्ञावान!

By admin | Published: May 07, 2017 5:12 AM

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या राजगौरी पवार या १२ वर्षांच्या मराठी मुलीने अलिकडेच झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्ट’मध्ये

लंडन : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या राजगौरी पवार या १२ वर्षांच्या मराठी मुलीने अलिकडेच झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्ट’मध्ये ज्यांना ‘जिनियस’ म्हणून ओळखले जाते त्या अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टिफन हॉकिंग या दोन थोर वैज्ञानिकांहूनही दोन अधिक अंक मिळविले असून याबद्दल तिला ‘मेन्सा’ या प्रतिष्ठित सोसायटीचे सदस्यत्व देऊ करण्यात आले आहे.गेल्या महिन्यात मॅन्चेस्टर येथे झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्ट’मध्ये राजगौरीने १८ वर्षांखालील स्पर्धकासाठी मिळू शकणारे कमाल १६२ अंक मिळविले. राजगौरी चेशायर कौंटीची रहिवासी आहे.‘मेन्सा’ संस्थेने सांगितले की, या ‘आयक्यू’ चाचणीत १४० अंक मिळविणारे ‘जिनियस’ मानले जातात. स्पर्धकाच्या वयानुसार त्यास मिळू शकणारे कमाल अंक ठरलेले असतात. चाचणी देणाऱ्यांपैकी जेमतेम एक टक्का स्पर्धक त्यांच्या गटासाठी असलेले कमाल अंक मिळवितात. आत्तापर्यंत जगभरातील फक्त २० हजार जणांनी असे कमला ‘आयक्यू’ अंक मिळविले आहेत. राजगौरी आता या निवडक प्रज्ञावंतांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.राजगौरीला मिळालेले १६२ अंक हे आइन्स्टाईन व स्टिफन हॉंिकंग यांच्या ‘आयक्यू’हून दोनने जास्त आहेत.राजगौरी चेशायरमधील अर्ल्टिंन्चॅम गर्ल्स ग्रामर स्कूलमध्ये शिकते. तिचे  वडील सुरजकुमार पवार व्यवसायाने डॉक्टर आहेत. (वृत्तसंस्था)चाचणीच्या आधी मी जरा नर्व्हस होते, पण नंतर सर्व ठीक झाले. एवढ्या चांगल्या कामगिरीने मला खूप आनंद झाला.- राजगौरी पवारशिक्षकांचे प्रयत्न आणि शाळेत तिला दररोज मिळणाऱ्या पाठिंब्यामुळेच राजगौरी हे यश मिळवू शकली.-डॉ. सुरजकुमार पवार, राजगौरीचे वडीलआम्हा सर्वांना खूप आनंद झाला. राजगौरी सर्वांचीच लाडकी आहे व तिच्याकडून आणखीही महान गोष्टींची अपेक्षा आहे.-अ‍ॅन्ड्रयू बॅरी, राजगौरीचे गणित शिक्षक