लंडन : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या राजगौरी पवार या १२ वर्षांच्या मराठी मुलीने अलिकडेच झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्ट’मध्ये ज्यांना ‘जिनियस’ म्हणून ओळखले जाते त्या अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टिफन हॉकिंग या दोन थोर वैज्ञानिकांहूनही दोन अधिक अंक मिळविले असून याबद्दल तिला ‘मेन्सा’ या प्रतिष्ठित सोसायटीचे सदस्यत्व देऊ करण्यात आले आहे.गेल्या महिन्यात मॅन्चेस्टर येथे झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्ट’मध्ये राजगौरीने १८ वर्षांखालील स्पर्धकासाठी मिळू शकणारे कमाल १६२ अंक मिळविले. राजगौरी चेशायर कौंटीची रहिवासी आहे.‘मेन्सा’ संस्थेने सांगितले की, या ‘आयक्यू’ चाचणीत १४० अंक मिळविणारे ‘जिनियस’ मानले जातात. स्पर्धकाच्या वयानुसार त्यास मिळू शकणारे कमाल अंक ठरलेले असतात. चाचणी देणाऱ्यांपैकी जेमतेम एक टक्का स्पर्धक त्यांच्या गटासाठी असलेले कमाल अंक मिळवितात. आत्तापर्यंत जगभरातील फक्त २० हजार जणांनी असे कमला ‘आयक्यू’ अंक मिळविले आहेत. राजगौरी आता या निवडक प्रज्ञावंतांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.राजगौरीला मिळालेले १६२ अंक हे आइन्स्टाईन व स्टिफन हॉंिकंग यांच्या ‘आयक्यू’हून दोनने जास्त आहेत.राजगौरी चेशायरमधील अर्ल्टिंन्चॅम गर्ल्स ग्रामर स्कूलमध्ये शिकते. तिचे वडील सुरजकुमार पवार व्यवसायाने डॉक्टर आहेत. (वृत्तसंस्था)चाचणीच्या आधी मी जरा नर्व्हस होते, पण नंतर सर्व ठीक झाले. एवढ्या चांगल्या कामगिरीने मला खूप आनंद झाला.- राजगौरी पवारशिक्षकांचे प्रयत्न आणि शाळेत तिला दररोज मिळणाऱ्या पाठिंब्यामुळेच राजगौरी हे यश मिळवू शकली.-डॉ. सुरजकुमार पवार, राजगौरीचे वडीलआम्हा सर्वांना खूप आनंद झाला. राजगौरी सर्वांचीच लाडकी आहे व तिच्याकडून आणखीही महान गोष्टींची अपेक्षा आहे.-अॅन्ड्रयू बॅरी, राजगौरीचे गणित शिक्षक
मराठी मुलगी आइन्स्टाइनहून प्रज्ञावान!
By admin | Updated: May 7, 2017 05:12 IST