शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा मसुदा १५ जुलैैला खुला होणार; मसापमध्ये बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 05:40 IST

१५ आॅगस्टपर्यंत सूचना पाठवाव्यात

पुणे : सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, याबाबतच्या कायद्याचा मसुदा १५ जुलै रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर खुला करण्यात येणार आहे. १५ आॅगस्टपर्यंत सूचना, दुरुस्ती मागवण्यात आल्या असून, सुधारित मसुदा २० आॅगस्टपर्यंत शासनाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. कायद्याचे पालन न करणाऱ्या शिक्षणसंस्थांना नोटीस, दंड आणि मान्यता रद्द करणे अशा तीन टप्यातील शिक्षेची तरतूद कायद्याच्या मसुद्यात आहे.मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे, विधिज्ञ आणि साहित्यिक यांच्यासमवेत बुधवारी बैठक झाली. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, नागनाथ कोतापल्ले, प्रा. हरी नरके, अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, अ‍ॅड. एस. के. जैन, अ. ल. देशमुख, रोहित तुळपुळे, प्रकाश चौधरी, अंजली कुलकर्णी, अ‍ॅड. प्रमोद आडकर आदी उपस्थित होते.नीलम गोºहे म्हणाल्या, २४ जूनला साहित्यिकांनी मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते. तत्पूर्वी २० जूनला औचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कायद्याबाबत अनुकूलता दर्शवली. कायद्याचा मसुदा अधिकाधिक अचूक व्हावा, यासाठी बैठकीत कायदे तज्ज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत. कायदा झाल्यानंतर सूचना करण्यापेक्षा अधिकाधिक अभ्यासकांनी, शिक्षणसंस्थांनी हा मसुदा जाणून घ्यावा, अशी अपेक्षा आहे. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, तरतुदीची अंमलबजावणी व्हावी. विधानसभा निवडणुकांपूर्वी वटहुकूम काढावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.मसुद्यावर चर्चाबैठकीत कायद्याचा मसुदा मान्यवरांसमोर ठेवण्यात आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये विधीतज्ज्ञांनी काही बदल आणि दुरुस्ती सुचविले आहेत.मूळ मसुद्यामध्ये कंसात हे बदल नमूद करुन तो सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे.