शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई-पुण्यापुरताच का? राज्यातील साहित्य संघटनेने घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 09:18 IST

केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने ‘साहित्य सेतू’  उपक्रम जाहीर केला आहे. हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का, असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना पडत असतो हे लक्षात ठेवणे शासनाचेच काम आहे, अशी तीव्र भावना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. 

केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात, आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, याचे शासनाला वारंवार स्मरण का करून द्यावे लागते, अशी विचारणा शासनाला केली आहे. शासनाला अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सामावून घेणारा सहभाग द्यावा असे धोरण असावे असे का वाटत नाही, असा सवालही जोशी यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले की, शासनाच्या अशा कार्य पद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जात आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्यालादेखील बाधा पोहोचते, हेदेखील पत्रातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :marathiमराठी