शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : लोकसंख्या ३०% मात्र सरकारी नोकरीमध्ये अपुरे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:28 IST

मागासवर्ग आयोगाचा अहवाल : ‘अ’ वर्गात १८.९५ टक्के मराठा

मुंबई : मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या सुमारे तीस टक्के आहे तथापि या समाजात पदवीधारक ही किमान शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवारांचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्याने शासकीय, निमशासकीय सेवेतील या संवर्गात सदर समाजाचे प्रतिनिधित्व अपुरे असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने अहवालात म्हटले आहे.

या अहवालावर आधारित जो कृती अहवाल (एटीआर) राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत मांडला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार एकूण शासकीय नोकऱ्यांमध्ये मंजूर पदांच्या तुलनेत मराठा समाजाची टक्केवारी अशी आहे...क वर्ग ११.१, ब वर्ग १०.६, क वर्ग १६.०९, ड वर्ग १२.६ एकूण कार्यरत पदांपैकी मराठा समाजाचे प्रमाण असे - अ वर्ग - १८.९५, ब वर्ग १५.२२, क वर्ग १९.५६, ड वर्ग- १८.३३ 

प्रशासन सेवेतील प्रमाण ६.२%मराठा समाजाचे भारतीय प्रशासन सेवेतील प्रमाण सहा ६.२ टक्के असून थेट निवड भरती द्वारे हे प्रमाण शून्य दोन इतकी आहे मराठा समाजाचे भारतीय पोलीस सेवेतील प्रमाण १५.९२ इतके तर भारतीय वनसेवेतील प्रमाणे ८.७ टक्के इतकी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ४.३० टक्के पदे मराठा समाजातील उच्च शिक्षितानी धारण केलेली आहेत तसेच मराठा समाजाचे राज्यातील सर्व विद्यापीठांमधील तांत्रिक, वैद्यकीय, कृषी, वाणिज्य व सर्वसाधारण शाखामधील पदवी अभ्यासक्रमातील अत्यल्प प्रमाण हे सामाजिक अक्षमता, आर्थिक असमर्थता, शैक्षणिक दुर्बलता असल्याचे दर्शविते.

केवळ ०.५३% चारचाकी वाहनधारक!  वार्षिक उत्पन्न ५० हजारापेक्षा कमीराज्यातील मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सधन असल्याचा आजवर अनेकांचा समज होता; मात्र यासमाजातील कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांहून कमी असून केवळ ०. ५३ टक्के कुटुंबांकडे स्वत:च्या मालकीचे चारचाकी वाहन आहे, अशी माहिती मागासवर्ग आयोगाच्या अहवालात देण्यात आली आहे.मागासवर्ग आयोगाने केलेल्या अभ्यासातून मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीची वस्तुनिष्ठ माहिती समोर आली आहे. या अहवालावर आधारित सरकारने विधिमंडळात मांडलेल्या कृती अहवालातील आकडेवारीनुसार मराठा समाज आर्थिकदृष् ट्या मागास असल्याचे दिसून येते. साखर कारखाने, सूतगिरण्या आणि सहकारी बँकांवर या समाजातील नेत्यांचे वर्चस्व असले तरी, समाजातील कुटुंबाचे सरासरी उत्पन्न ५० हजाराहून कमी आहे.४९ टक्के मराठा कुटुंबांकडे कोणतेही वाहन नाही. ४७ टक्के कुटुंबांकडेदुचाकी वाहन आहे. तर केवळ ०.५३ टक्के चारचाकीधारक आहेत. शेतीसाठी लागणाºया वाहनांबाबत ७८ टक्के मराठा कुटुंबांकडे कोणतेही वाहन नाही. ७०.५६ टक्के कुटुंब कच्च्या घरात राहतात.दारिद्रय रेषेखालील मराठा समाजाचा विचार करायचा झाल्यास ७२.८२ टक्के मराठा कुटुंबे यांचे उत्पन्न दरवर्षी सरासरी ५० हजार रुपये प्रतिवर्षपेक्षा कमी होते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजात ३७.२८ टक्के लोक दारिद्रयरेषेखाली आहेत. ५२ टक्के मराठा कुटुंबे कृषी तथा अकृषक कारणांसाठी संस्थापक तथा संस्था बाह्य कर्ज घेतात.२५ पैकी २१.५ टक्के गुणराज्य मागासवर्ग आयोगाने एखाद्या नागरिकांच्या वर्गात मागासवर्ग म्हणून घोषित करण्यासाठी सुनिश्चित केलेला निकषानुसार मराठा समाजास एकूण २५ पैकी २१.५ टक्के गुण प्राप्त झाले असून हे प्रमाण निश्चित गुणांच्या तुलनेत ९० टक्के एवढे आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण