शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चा काढण्याआधी शिष्टमंडळाने चर्चेला यावे -  चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 19:15 IST

मुंबईत  9 ऑगस्ट रोजी काढण्यात येणा-या मराठा मोर्चा आधी शिष्ठमंडळाने राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा करावी, त्यासाठी राज्य सरकार शिष्ठमंडळाला चर्चेचे निमंत्रण

ठळक मुद्देआरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा मुद्दा अजून न्यायप्रविष्ठ आहे.शिष्ठमंडळाने राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा करावीक्रांतीदिनी मुंबईत मराठा क्रांती मोर्चामोर्चात संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार

मुंबई, दि. 01 - मुंबईत  9 ऑगस्ट रोजी काढण्यात येणा-या मराठा मोर्चा आधी शिष्ठमंडळाने राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा करावी, त्यासाठी राज्य सरकार शिष्ठमंडळाला चर्चेचे निमंत्रण देईल, असे  राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी म्हटले आहे. मुंबईतीत 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी मुंबईत मराठा महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा तरुणांसाठी सरकारनं अनेक निर्णय घेतले.  तर दुसरीकडे आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा मुद्दा अजून न्यायप्रविष्ठ आहे. सरकार यासाठी चर्चेतून तोडगा काढण्यास तयार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परीक्षा अशा अनेक कारणांनी लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा समाजाच्या मोर्चाची तारीख अखेर ठरली. रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आला होता. राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत खासदार संभाजीराजे भोसले, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सर्वसामान्य लोक उपस्थित होते.मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन या बैठकीत मराठा नेत्यांनी दिले आहे. तर, या मोर्चात संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार आहेत. कोपर्डी घटनेनंतर महाराष्ट्रात एकूण 58 मराठा मोर्चे निघाले. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभरात शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा काढण्यात आला. आता राज्याची राजधानी मुंबईतही मराठा मोर्चाचे वादळ धडकणार आहे.