शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

९ आॅगस्ट रोजी मुंबईत धडकणार मराठा क्रांती मोर्चा

By admin | Updated: June 16, 2017 20:05 IST

मराठा समाजातील विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आला अशी माहिती , मराठा क्रांती मोर्चाचे

 ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 - मराठा समाजातील विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आला अशी माहिती , मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी पत्रकार परिषदेत येथेदिली. या मोर्चाची राज्यभर जय्यत तयारी सुरू असून १८ जून रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. समन्वयक म्हणाले की, कोपर्डीतील घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. असे असताना त्या पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नाही, जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना सहा महिन्यात फासावर लटकविण्यात येईल, ही शासनाची घोषणाही फुसकी ठरली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,यासह विविध मागण्यासाठी पहिला मराठा क्रांती मोर्चा ९ आॅगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेत काढण्यात आला. या मोर्चानंतर राज्यात आणि देशातील अन्य राज्यातही मराठा क्रांती मोर्चे निघाले. जानेवारी महिन्यात मुुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मराठा क्रांती मोर्चात सत्ताधाऱ्यांनी फुट पाडली आणि मुंबईचा मोर्चा स्थगित करावा लागला. आता मात्र फुट पाडणाऱ्यांना बाजुला ठेवून पुन्हा मराठा क्र ांती मोर्चाचे राज्य समन्वयक एकत्र आले. २२ ते २४ मे दरम्यान मुंबईत बैठका झाल्या. या बैठकीत ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तसेच मराठा समाजातील मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची शपथ शिवराज्यभिषक दिन रायगडावर घेण्यात आली. शिवाय आज शुक्रवारी येथे जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील स्थानिक पदाधिकाऱ्यांंनी या मोर्चाच्या तयारीत स्वत:ला झोकून दिले आहे. या महामोर्चाला महाराष्ट्र आणि सीमा भागातील मराठा बांधव आणि मराठाबहुल सात राज्यातील लोक सहभागी होणार आहे. या मोर्चासाठी मुंबईला जाणाऱ्यांच्या वाहनांची पार्किग करण्यासाठी सात मोठी मैदाने निवडण्यात आली. या पत्रकार परिषदेला रवी काळे, अप्पासाहेब कुढेकर,सुनील कोटकर, प्रा.माणिक शिंदे,रमेश केरे,रेखा वाकडे, किरण काळे, सुचिता जोगदंड, मनोोज गायके,सतिश वेताळ, ज्ञानेश्वर गायकवाड,निलेश ढवळे, पंकज चव्हाण, शैलेश भिसे, प्रशांत इंगळे, राहुल बनसोड, काकडे पाटील आदी उपस्थित होते. बँक खाते उघडणारमुंबईतील महामोर्चासाठी लागणाऱ्या खर्चासाठी समाजबांधवाकडून मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येत असल्याचे समन्वयकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय सर्व व्यवहार धनादेशानेच केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.