शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या!

By admin | Updated: October 17, 2016 04:13 IST

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह ११ मागण्यांचे निवेदन ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी देण्यात आले.

ठाणे : मराठा समाज हा परंपरेने शेती करणारा असून रूमणे अर्थात कुणबा धरणारा तो कुणबी अशी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली असल्याने मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह ११ मागण्यांचे निवेदन ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी देण्यात आले.मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे गेल्या ३५० वर्षांच्या कागदपत्रांत सापडतात. हे पुरावे असूनही शाळेमध्ये जन्माची नोंद करताना कुणबी लिहिले नाही, फक्त मराठा अशी नोंद आहे म्हणून कुणबी जातीचे प्रमाणपत्र नाकारण्यात येते. हा घोर अन्याय असून तो सरकारने तत्काळ दूर करावा व मराठा जात लिहिलेल्या सर्व अर्जदारांना मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमल्यानंतर तेथे युवतींनी त्याचे प्रतिनिधित्व केले. आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आठ युवतींच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांसाठी ११ मागण्यांचे निवेदन दिले. तत्पूर्वी दोन युवतींनी निवेदन आणि प्रमुख मागण्यांचे वाचन जिल्हाधिकाऱ्यांसमोर केले.कोणीही नेता नसलेल्या या मोर्चाच्या शिस्तीचे अमेरिकेपासून जपानपर्यंत जगभरात सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. परंतु, हा मूक मोर्चा कौतुकासाठी, गर्दीचे उच्चांक स्थापन करावे यासाठी नाही; तर शेती परवडत नाही. भरमसाट फीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही, उद्योगासाठी भांडवल नाही, आरक्षण नाही म्हणून नोकरी नाही, अ‍ॅट्रॉसिटीसारखे जाचक कायदे, यातून आलेले नैराश्य व होणाऱ्या आत्महत्या, यासह एकंदरीतच व्यवस्थेविरोधात मराठा समाजाने मोर्चारूपाने व्यक्त केलेली ही खदखद आहे, अशा आशयाचे निवेदन वाचण्यात आले. त्यानंतर, युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, अन्य सरकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>मराठा क्रांती मोर्चात प्रामुख्याने कोपर्डी घटनेतील आरोपींविरोधातील खटला शीघ्रगतीने चालवणे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, मराठा समाजासाठी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण, मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणे, आदिवासी क्षेत्रासाठीच्या पेसा कायद्याची चुकीच्या पद्धतीने चाललेली अंमलबजावणी थांबवणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, जमीन संपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे बंद करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस आर्थिक मदत देणे आणि छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईत उभारणे, या मागण्या व त्यावरील उपाययोजनांचे वाचन करण्यात आले.