शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मपोसे’ अधिकारी आयपीएससाठी वेटिंगवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 05:11 IST

२७ मार्चची दिल्लीतील त्याबाबतची बैठक रद्द झाल्यानंतर गृह विभागातील अधिका-यांना नवीन तारीख अद्याप कळविलेली नाही.

मुंबई : सनदी अधिकाऱ्यांची अनास्था, प्रशासकीय दिरंगाईमुळे आधीच दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या अखिल भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) संवर्ग पदोन्नतीला आता कोरोनाचे निमित्त मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील (मपोसे) १७ अधिकाऱ्यांना त्याचा फटका सोसावा लागत आहे. आयपीएस बनण्यासाठी पात्र असतानाही ते गेली जवळपास अडीच वर्षे ‘सक्ती’च्या प्रतीक्षेत आहेत.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. २७ मार्चची दिल्लीतील त्याबाबतची बैठक रद्द झाल्यानंतर गृह विभागातील अधिका-यांना नवीन तारीख अद्याप कळविलेली नाही. त्यामुळे मराठी अधिका-यांना कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे.आयपीएस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य सेवेतून भरल्या जातात. यूपीएससीकडून निवड करून केंद्र सरकारला कळविले जाते. महाराष्ट्राच्या मपोसेच्या कोट्यातील २०१७ या वर्षातील ७ आणि २०१८ मधील ५ व केडर पडताळणीतून ५ अशा आयपीएसच्या एकूण १७ जागा रिक्त आहेत. त्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार ५१ पात्र अधिकाºयांच्या प्रस्तावाची यादी पाठविली आहे. या कामासाठी विविध कारणांमुळे विलंब झाला होता. त्याबाबत ‘लोकमत’ने २० जानेवारीला वृत्त प्रकाशित केल्यानंतर गृह विभागाने यूपीएससीच्या निवड समितीशी संपर्क साधून २७ मार्चला बैठकीसाठी तारीख निश्चित केली होती. मात्र आता कोरोनामुळे बैठकीवरच पाणी पडले.>‘व्हीसी’द्वारे बैठक सहज शक्यकोरोनामुळे शासकीय स्तरावर वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) घेण्यात येत आहेत. असे असताना निवड समितीला प्रत्यक्ष शारीरिक बैठकीचा का आग्रह आहे? ती व्हीसीद्वारे का घेतली जात नाही, असा सवाल अधिकाºयांतून व्यक्त होत आहे.>आणखी ९ पदांची भर‘मपोसे’ना आयपीएस संवर्गसाठी १७ रिक्त पदांकरिता प्रस्ताव बनविला असताना आता २०१९ या वर्षातील ९ जागा आणखी वाढल्या आहेत.त्याबाबत मुख्यालयाने गृह विभागाकडे मार्चमध्ये २००३ नंतर भरती झालेल्या अधिकाºयांची यादी पाठविली आहे. त्याचीही छाननी करून एकत्रित प्रस्ताव बनविल्यास २६ अधिकारी एकाचवेळी आयपीएस बनू शकतात.मात्र तूर्तास नव्याने वाढीव काम नको म्हणून गृह विभाग १७ पदांसाठीच्या प्रस्तावावर कायम आहे.