शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

मंत्रिमहोदय अडकले लिफ्टमध्ये

By admin | Updated: December 28, 2014 01:36 IST

वानवडी येथील महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कॅबिनेट मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आतमध्ये अडकले.

पुणे : वानवडी येथील महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कॅबिनेट मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आतमध्ये अडकले. त्यावेळी आमदार जगदीळ मुळीक यांच्यासह कार्यकर्त्यांनी धावाधाव करून त्यांना त्यांना बाहेर काढले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला़ या आपत्कालीन प्रसंगी सभागृहाचे व्यवस्थापन पाहणारा महापालिकेचा एकही अधिकारी जागेवर नव्हता. महात्मा फुले सभागृह येथे एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीपाद नाईक, गिरीष बापट, दिलीप कांबळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. नाईक, बापट, कांबळे व काही पदाधिकारी लिफ्टमध्ये गेले उर्वरित कार्यकर्ते जिन्याने सभागृहामध्ये जाऊ लागले. मात्र लिफ्टचा दरवाजा बंद झाल्यानंतर ती जागेवरच थांबली. लिफ्टचा दरवाजाही उघडेना व ती वरही जाईना. हा प्रकार बाहेरील कार्यकर्त्यांच्या लक्षात आला. सभागृहाचा व्यवस्थापक अथवा तेथील व्यवस्था पाहणारा कोणीही कर्मचारी त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे लिफ्टचा दरवाजा कसा उघडायचा असा पेच निर्माण झाला. अखेर लिफ्टच्या दरवाजामध्ये मोटारीची चावी घालून तो उघडण्याचे प्रयत्न सुरू केले. दहा मिनिटांच्या प्रयत्नानंतर मंत्रीमहोदयांची लिफ्टमधून सुटका करण्यात यश आले. (प्रतिनिधी)अन् धोका टळला : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे ते जास्तवेळ लिफ्टमध्ये राहणे धोक्याचे होते. लिफ्टमधून लवकर त्यांना बाहेर काढण्यात यश आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वा:स सोडला. केंद्रीय मंत्री, राज्याचे कॅबिनेट व राज्यमंत्री एका कार्यक्रमासाठी महापालिकेच्या सभागृहामध्ये आले असताना सभागृहाच्या व्यवस्थापकांसह महापालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे याप्रकाराविरूध्द आंदोलन छेडणार असल्याचे पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले.