शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

मनपावर शासनाची आर्थिक कृपा

By admin | Updated: December 28, 2014 00:42 IST

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेवर आता राज्य सरकारची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा शासनाकडे रखडलेला निधी मिळण्यास हळुहळू सुरुवात झाली आहे.

मुद्रांकापासूनच्या एलबीटीचे ११ कोटी मिळाले : मलेरिया फायलेरियाचे १४ कोटी मंजूरनागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेवर आता राज्य सरकारची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा शासनाकडे रखडलेला निधी मिळण्यास हळुहळू सुरुवात झाली आहे. येत्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.मुद्रांक शुल्कावर एक टक्का एलबीटी आकरण्यात येतो. ही रक्कम आधी राज्य सरकारकडे जमा होते व नंतर ती महापालिकेला दिली जाते. एलबीटीचे ११ कोटी शासनाकडे थकीत होते. ही रक्कम नुकतीच महापालिकेला मिळाली आहे. मलेरिया फायलेरियाचे देखील ७० कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी ४३ कोटी रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली होती. यापैकी १४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. आयआरडीपी अंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांसाठी पेट्रोलवर वसूल करण्यात आलेल्या सेसमध्ये महापालिकेच्या वाट्याचे ५५ कोटी रुपये आहेत. या बाबतही आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी २५ कोटी रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. संबंधित फाईलला मंजुरी मिळतच संबंधित निधी महापालिकेला दिला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच नागपूर महापालिकेला १०० कोटी रुपयांची मदत केली जाईल, असे जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे.(प्रतिनिधी)नव्या आर्थिक वर्षात मिळणार विशेष अनुदाननागपूर हे उपराजधानीचे शहर असल्यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दरवर्षी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही केवळ घोषणाच ठरली. मात्र,आता नागपूरचे असलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा विशेष अनुदान देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. नव्या आर्थिक वर्षापासून महापालिकेला हे विशेष अनुदान मिळण्याची शक्यता आहे. दहा दिवसात रस्त्यांचा प्रस्तावशहरातील रस्त्यांचे चित्र पालटण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३०० कोटी रुपये देण्यासाठी एक नवा फार्म्युला तयार केला आहे. महापालिकेला रस्त्यांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत. सोमवारी या प्रस्तावावर काम सुरू होईल, असे महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले. या संबंधीचा प्रस्ताव तयार करून दहा दिवसात राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठविला जाईल. महापालिका व नासुप्रला प्रत्येकी १०० कोटी रुपये द्यायचे आहेत. राज्य सरकार १०० कोटी रुपयांची मदत करेल.