परतवाड्यातील घटना : बघ्यांनी केल्या ओकाऱ्यानरेंद्र जावरे - अचलपूर (जि. अमरावती)शहरातील नेहमी गजबजलेला अग्रसेन चौक. सकाळची वेळ असल्याने फारशी वर्दळ वाढली नसली तरी शाळा-महाविद्यालयांची वेळ असल्याने बरीच ये-जा सुरू होती. अशात एक मनोरूग्ण येतो आणि रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडलेल्या कुत्र्याच्या शरीराचे तोंडाने लचके तोडू लागतो. बघणारे लोक शहारतात. कोणालाच काय करावे ते सुचत नाही. अनेकांना तर ओकाऱ्या होतात. शेवटी पोलीस आणि पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या विमनस्क व्यक्तिला पिटाळून लावले जाते अन् मृत कुत्र्याची विल्हेवाट लावली जाते.शनिवारी सकाळी ८ वाजता परतवाडा शहरातील चिखलदरा स्टॉपवर अनेकांनी हा विकृत प्रकार अनुभवला. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मृत कुत्रे बिच्छन नदीच्या पात्रात फेकल्यानंतरही या प्रकाराची चर्चा सुरूच होती. परतवाडा शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे चिखलदरा थांब्यानजीक विश्रामगृह आहे. पांढरा पूल परिसरात रस्त्याच्या कडेला एक मेलेला कुत्रा पडून होता. शुक्रवारी रात्री बहुधा त्या कुत्र्याचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा अंदाज उपस्थितांनी वर्तविला. मृत कुत्र्याच्या शेजारीच लाल रंगाचे शर्ट व भुरकट रंगाची पँट घातलेला एक माणूस बसून होता. पण तो असा काही विकृत प्रकार करेल हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. बघता-बघता त्या माणसाने कुत्र्याचे लचके तोडण्यास सुरूवात केली. विकृतीचा कळस म्हणजे त्याने त्या कुत्र्याचे पोट तोंडाने फाडल्यानंतर शरीरातून पडणारे रक्त जमिनीवर सांडले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने कुत्रे नदीपात्रात फेकल्यावर त्याने ज्या मातीवर रक्त सांडले ती माती सुद्धा उचलून खाल्ली. अचलपूर - परतवाडा या जुळ्या नगरीत वेडसर व्यक्तिंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्याकडून असे विकृत चाळे वारंवार केले जातात. परंतु ही घटना मात्र या सगळ्यांवर कळस ठरली आहे. तोंडाने फाडले कुत्र्याचे पोटमृत कुत्र्याला दोन्ही हाताने उचलून त्याने मांडीवर घेतले व त्याचे पोट तोंडाने फाडून आतडे खाण्याचा किळसवाणा प्रकार तो करीत होता. दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करणारे जमीर भाई यांनी ते दृश्य बघताच त्यांना ओकारी झाली. पोलीस, सफाई कर्मचारी धावलेसदर व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे उपस्थित पोलीस कर्मचारी व अचलपूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला हटकले. परंतु तो कुत्र्याचे लचके तोडण्यात मग्न होता. त्याला विरोध केल्यावर नजीकच्या पांढऱ्या पुलाखालून वाहणाऱ्या बिच्छन नदीपात्रात मृत कुत्र्याला फेकण्यात आले आणि त्या विकृत इसमास शहराबाहेर हाकलून लावण्यात आले.
मनोरूग्णाने मृत कुत्रा खाल्ला
By admin | Updated: August 3, 2014 00:55 IST