शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटील राणेंच्या बालेकिल्ल्यात जाणार; राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पुतळ्याची पाहणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:42 IST

दोन दिवसापूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली.

दोन दिवसापूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली.  या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता. यावेळी ठाकरे गट आणि राणे समर्थक समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले आणि दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान,आता मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत.

Jayant Patil "आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जरोंगे पाटील यांनी यावेळी महायुती सरकारवर टीकाही केली. जरांगे पाटील म्हणाले, '१ सप्टेंबर रोजी आम्ही मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे, त्याची पाहणी करणार आहे. मालवण हा कोणाचा बालेकिल्ला असं काही नाही,छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे'. 

"हे स्मारक कोसळल्यामुळे अठरापगड जातींच्या भावना दुखावल्या आहेत. हा आमच्यासाठी धक्कादायक विषय आहे. आम्ही आमच्या राजासाठी राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे, हे माझ्या मनात आलं. म्हणून आम्ही भेट देणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे,या प्रकरणात राजकारण केलं नाही पाहिजे. राजकारणासाठी आणखी जागा आहे'. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांना राणेंच्या बालेकिल्ल्यात जाणार का असा प्रश्न केला. यावेर बोलताना पाटील म्हणाले, कोण कोणाकडे येणार आणि कोण कोणाकडे जाणार याच्यात आम्हाला रस नाही,असंही जरांगे म्हणाले. 

"स्मारक पडलं याचं आम्हाला वाईट वाटत आहे. बांधकाम करणारा कोण आहे? यात आता उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे. ज्याने काम केलं त्याचा हा दोष आहे. याच्यात राजकारण नको आहे असं आमचं म्हणणं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarayan Raneनारायण राणे