शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 14:27 IST

सरकारने सगळ्या मागण्या तातडीने मंजूर कराव्या. तिनही गॅझेट 2-4 दिवसांत लागू करणे, ही सरकारची जबाबदारी आहे.  मला राजकीय वळणावर जायला भाग पाडू नका, ही फडणवीस यांची जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेबांना संधी दिली, अशी एक दिवस आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घोषणा केली होती. परंतू, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 

सरकारने सगळ्या मागण्या तातडीने मंजूर कराव्या. तिनही गॅझेट 2-4 दिवसांत लागू करणे, ही सरकारची जबाबदारी आहे.  मला राजकीय वळणावर जायला भाग पाडू नका, ही फडणवीस यांची जबाबदारी आहे. मला राजकीय भाषा बोलायची नाही. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ईडब्ल्यूएसमधून भरलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले जात आहे, हे योग्य केले जात नाही. मराठ्यांचे कल्याण न होण्यासाठी फडणवीस पूर्णपणे दोषी आहेत. गरीब मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीस आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.

तसेच माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग पाडा पाड्या कशा झाल्या याबाबाबत माझ्या नावाने ओरडू नका. मला राजकीय वाटांवर फडणवीस यांनी जाऊ देऊ नये. किती दिवस झाले नुसते प्रक्रिया सुरू आहे म्हणूनच सांगत आहात. 7 महिने प्रक्रिया सुरू असते का? मला मूर्ख समजता काय? 2-4 दिवसांमध्ये आमच्या मागण्यांचे तुकडे पाडा, मी रस्त्यावर आलो तर तुमचा खेळ खल्लास होईल, असा इशारा जरांगे यांनी फडणवीस यांना दिला. 

जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुमचे राजकीय करीअर उध्वस्त करेन, अशी धमकीही जरांगे यांनी फडणवीस यांना दिली. भारतात अशी जात नाही की जिने वर्षभर सरकारला सहकार्य केले. आम्ही सहकार्यच केले. आता सरकारला लाज वाटायला हवी. 2-4 दिवसांत सगळ्या विषयाची अंमलबजावणी करावी. फडणवीसांनी कितीही गणिते करू द्या सगळे गणित मोडून टाकणार. फडणवीस हेच सगळ्यांच्या आरक्षणाला अडथळा आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण